Ram Mandir Inauguration : अयोध्येत आज (दि.22) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा सोहळा दिमाखात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी बॉलिवूडचे (Bollywod)अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित होते. गायक अनु मलिकही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. सोहळ्यादरम्यान, अनु मलिक भावूक झालेले पाहायला मिळाले. 


अनु मलिक भावूक 


अनु मलिक राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी ते भावूक झाले. त्यांनी शेरवानी परिधान केला होता. शिवाय त्यांच्या खांद्यावर गमछाही होता. या सर्वसामान्यांमध्ये उभे राहून मलिक प्रार्थना करत होते. 


 


अयोध्येत राम चरणचे जोरदार स्वागत 


देशभरातील लोक अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात होते. दुपारी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान, हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. एसएस राजामौलीच्या आरआरआर सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला राम चरणही प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी दाखल झाला आहे. अयोध्येत मोठ्या गर्दीत त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. श्रीरामाच्या रुपात बनवण्यात आलेला त्याचा फोटो राम चरणला भेट मिळालाय.


सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये राम चरण चाहत्यांसोबत आनंद घेताना दिसत आहे. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली आहे. या शिवाय चाहत्यांनी त्याला रामाचा फोटोही भेट दिलाय. या फोटोमध्ये राम चरणही आहे. राम चरणने श्रीरामाचा फोटो हातात घेतला आणि आशीर्वाद घेतले. त्यानंतर सोबत असलेल्या चिरंजीवीला हा फोटो ठेवण्यासाठी दिला. त्याशिवाय त्याला गुलाबही देण्यात आला आहे. 


कंगणाने घेतली बागेश्वर बाबाची भेट 


कंगणा रणौतने अयोध्येत बागेश्वर बाबाचीही भेट घेतली आहे. बागेश्वर बाबाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. कंगणाने बागेश्वर बाबा सोबतचे फोटो शेअर केले आहेत. कंगणा बागेश्वर बाबा माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत, असे म्हणाली आहे. मला वयाने लहान असणारा गुरु भेटला असल्याचेही कंगणा म्हणाली आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या


Hanuman : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा तेजा सज्जाच्या 'हनुमान'ला फायदा; सिनेमाने कमावला कोट्यवधींचा गल्ला