kangana Ranaut Met Bageshwar Baba : अयोध्येत आज (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी देशातील अनेक सेलिब्रिटींची, राजकीय नेत्यांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी अभिनेत्री कंगणा रणौत (kangana Ranaut) एक दिवस अगोदरच पोहोचली होती. अयोध्येत पोहोचल्यानंतर ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवत आहे. अयोध्येतील धर्मगुरुंची कंगणा रणौत (kangana Ranaut) भेट घेतना दिसत आहे. तिने राम भद्राचार्य यांची भेट घेतली. या शिवाय तिने प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरात जात दर्शन घेतले. त्यानंतर ती मंदिरात जाऊन साफ सफाई करतानाही दिसली आहे. 


बागेश्वर बाबाची भेट (Kangana Met Bageshwar Baba)


कंगणा रणौतने अयोध्येत बागेश्वर बाबाचीही भेट घेतली आहे. बागेश्वर बाबाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. कंगणाने बागेश्वर बाबा सोबतचे फोटो शेअर केले आहेत. कंगणा बागेश्वर बाबा माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत, असे म्हणाली आहे. मला वयाने लहान असणारा गुरु भेटला असल्याचेही कंगणा म्हणाली आहे. 


कंगणाने इन्स्टा स्टोरीमध्ये काय लिहिले? (Kangana Met Bageshwar Baba)


कंगणाने अयोध्येतील फोटो शेअर करताना लिहिले की, "पहिल्यांदा वयाने लहान असलेला गुरु भेटला. माझ्यापेक्षा जवळपास 10 वर्षांनी लहान आहे. मनाला वाटले तर लहान भावाप्रमाणे मिठू मारु. नंतर लक्षात आले की, कोणी वयाने मोठा आहे, म्हणून गुरु होत नाही. तर कामामुळे गुरु होतो. गुरुच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला, जय बजरंगबली"


कंगणाने घेतला धर्मेंद्रशास्त्री बागेश्वर बाबाचा आशीर्वाद (Kangana Met Bageshwar Baba)


कंगणा पुढे बोलताना म्हणाली की, कोणी वयाने मोठा आहे, म्हणून गुरु होत नाही. तर कामामुळे गुरु होतो. गुरुच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला, जय बजरंगबली"












इतर महत्वाच्या बातम्या 


Nayanthara Controversies : सरोगसी, प्रायव्हेट फोटो व्हायरल ते 'राम मांसाहारी होता' ; नयनतारा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात