Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलंय. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळालय. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन दिली आहे. 


अनुमप खेर (Anupam Kher) बॉलिवूडमधील त्याच्या विनोदी आणि खलनायकांच्या भूमिकेसाठी चर्चिले जातात. सिनेमांशिवाय अनुपम खेर (Anupam Kher) राजकीय आणि धार्मिक मुद्यांवरही अनुपम खेर भाष्य करत असतात. सोशल मीडियावर अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये खेर म्हणाले, "मी 22 जानेवारीला अयोध्येत माझे पूर्वज आणि खासकरुन माझे आजोबा पडित अमरनाथ यांना प्रेझेंट करेल. माझ्या पूर्वजांनी राम मंदिराच्या (Ram Mandir) स्थापनेसाठी स्वप्न पाहिले होते. माझे काश्मीरी बांधव आत्मिक रुपाने माझ्यासोबत असतील." या व्हिडिओमध्ये अनुपम खेर यांनी रामाचा गमझा घातलाय. खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 


काश्मीर पंडितांबाबत पुन्हा केले भाष्य 


अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये काश्मीरी पंडितांबाबतही भाष्य केले आहे. "राम अयोध्येत परतल्याने मोठा आत्मविश्वास मिळालाय. हा श्रीरामाचा आशिर्वादच आहे. त्यामुळेच मला समारंभात सहभागी होण्याचे आणि सर्वांना आनंद देण्याचे भाग्य लाभले. आम्ही रामाच्या घरवापसीची दिवाळी साजरी करणार आहोत. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळा राम किती महापराक्रमी होता हे दाखवणारा असेल. तुम्हा सर्वांसाठी मी प्रार्थना करेल. जय श्री राम", असे अनुपम खेर म्हणाले आहेत. 


प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बॉलिवूडमधून कोण लावणार हजेरी?


22 जानेवारी रोजी अयोध्येतील रामाच्या मूर्तीचा (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. आत्तापर्यंत अमिताभ बच्चन यांच्यापासून रणबीर-आलीय आणि कंगणा राणावतलाही या सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे.  दरम्यान, आता अनुपम खेर यांनाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील कोणते सेलिब्रिटी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हजेरी लावणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींशिवाय सचिन तेंडुलकरलाही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे राम मंदिराच्या उद्घाटनासाठी कोण कोण उपस्थित राहणार? हे पाहाणे औक्सुक्याचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Hema Malini : मशिदीचा वाद मिटला पाहिजे, आता मथुरेतही कृष्णाचे भव्य मंदिर बनले पाहिजे : हेमा मालिनी