Ram and Ravan : जोधा अकबर (Jodha Akbar)आणि शरीफुद्दीन हुसेन ते चेन्नई एक्सप्रेसच्या (Chennai Express) थंगबली पर्यंत अभिनेता निकितिन धीर ने आजवर निगेटिव्ह भूमिकाच मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. त्याने छोट्या पडद्यावरील 'श्रीमद् रामायण'मध्येही रावणाची भूमिका साकारली आहे. याबाबत अभिनेता निकितिन धीरने (nikitin dheer) भाष्य केले आहे. "समाजात तुम्हाला रावणच जास्त भेटतील, राम नाही", असे अभिनेता निकितिन धीर म्हणाली. 


तुम्हाला रामासारखे दिसणे फार मुश्किल (Ram and Ravan)


आम्ही अभिनय करतो. आमच्यासाठी या वेगवेगळ्या भूमिका असतात. आता तुम्ही काही सिनेमे पाहिले तर हिरोही निगेटिव्ह भूमिका करताना दिसत आहेत. समाजच असा झालाय की, तुम्हाला रामासारखे दिसणे फार मुश्किल आहे. इथे तुम्हाला रावणच जास्त भेटतील. तुम्ही केजीएफ 2 पाहा. तो रावण आहे. त्याने स्वत: हे सांगितले आहे. पुष्पा सिनेमाही पाहिला तर नेगेटिव्ह आहे. मात्र, लोक तो सिनेमा पाहात आहेत. अॅनिमल पण पाहा, असेच आहे. हा सध्याचा समाज आहे. याला कलयुग म्हटले जाते. 


थंगबली पुढे बोलताना म्हणाला, तुम्ही महानायक अमिताभ बच्चन यांची सुरुवातीची कारकिर्द पाहिली तर त्यांचेही रोल अँटीहिरोच राहिले आहेत. बच्चन सर आणि सलीम-जावेद यांनी मिळून अँटीहिरोच्या भूमिका इंडस्ट्रीमध्ये आणल्या आहेत. एक असा नायक आहे, जो गाणे म्हणत नाही, डान्स करत नाही. ज्याच्या आयुष्यात मुलगी येत नाही. असंख्य लोकांनी या बाबींना स्व:तशी रिलेट केले आहे. याच प्रमाणे आपली रामायण आहे. यामध्ये राम आहे आणि रावणही आहे. दोघांच्या भूमिका कुठेना कुठे समान आहेत. मात्र, परिस्थितीने दोघांना वेगळे केले आहे. 


रावणाची भक्ती त्याची विद्वत्ता आजही प्रसिद्ध (Ram and Ravan)


पुढे बोलताना अभिनेता म्हणाला, रामायणाबाबत आम्ही लहानपणापासून आजी-आजोबाकडून ऐकत आलो आहोत. त्यामुळे राम आणि रावण यांच्या भूमिकांबद्दल लहाणपणापासून चांगली माहिती आहे. मला वाटते रावणाची भूमिका करणे इंटरेस्टिंग आहे. कंस किंवा दुर्योधनाप्रमाणे रावणाचा धिक्कार केला जात नाही. रावणाची भक्ती त्याची विद्वत्ता आजही प्रसिद्ध आहे, असे निकितिन धीर म्हणाला आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या


Ram Mandir : अख्ख्या बाॅलिवूडला राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण, पण किंग शाहरुख, सलमान, अमीर अन् दीपिकाला वगळले!