Mahesh Babu,Suniel Shetty : गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू (Mahesh Babu) हा त्यानं केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. यावेळी महेश बाबूनं बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबाबत सांगितलं होतं. 'बॉलिवूडला मी परवडत नाही', असं तो म्हणाला होता. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी महेश बाबूच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) देखील प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टी म्हणाला, आपण भारतीय आहोत आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहिले तर भाषेचे बंधन राहात नाही. तेथे कंटेंट आवश्यक आहे. मी पण साउथचा आहे पण माझे कामाचे ठिकाण मुंबई आहे त्यामुळे मला मुंबईकर म्हणतात.'
पुढे सुनील म्हणाला, कोणता चित्रपट पाहावा आणि कोणता पाहू नये हा निर्णय प्रेक्षक घेत आहेत. आपली समस्या ही आहे की आम्ही प्रेक्षकांना विसरलो आहोत. सिनेमा असो किंवा ओटीटी, बाप हा बापच राहणार, कुटुंबातील बाकीचे सदस्य कुटुंबातीलच राहणार. बॉलीवूड नेहमीच बॉलीवूड राहील. आपण विचार केला पाहिजे, कारण आजच्या काळात कंटेंट हाच राजा आहे हे सत्य आहे.'
सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. केजीएफ-2, आरआरआर या दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. याबाबत मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमामध्ये महेश बाबूनं बॉलिवूडबाबत वक्तव्य केलं होतं. 'मला बॉलिवूडमधून खूप ऑफर्स आल्या. बॉलिवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही. तेलगू चित्रपटांमुळेच मला स्टारडम आणि लोकांचं प्रेम मिळालं. ' पुढे महेश बाबू म्हणाला होता, 'माझा उद्देश पॅन इंडिया स्टार व्हायचा नाहीये. मला दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरात यश मिळवून द्यायचंय. मला आधी पासूनच तेलगू चित्रपटांमध्ये काम करायचे होते आणि माझी इच्छा होती की भारतातील सर्व लोकांनी हे चित्रपट बघावेत.
1983 साली 'पोरातम' या चित्रपटातून बाल भूमिकेच्या माध्यमातून महेश बाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 1999 साली 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.
महत्वाच्या बातम्या :
- Deepika Padukone : Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अॅम्बेसेडर; अशी निवड झालेली पहिलीच भारतीय महिला
- Jacqueline Fernandez : ‘फक्त IIFA पुरस्कारांत सामील होऊ द्या!’, ईडीने पासपोर्ट जप्त केल्याने जॅकलिनची कोर्टात धाव!
- Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर दिसणार हिना खानचा जलवा! ‘कान्स’मध्ये सामील होणार टीव्ही अभिनेत्री!