Avinash Jadhav : मीरा-भाईंदर शहरात उद्या 8 जुलैला मराठी अस्मितेसाठी मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे व ‘उबाठा’ संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्यानं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या नोटिसांचा मनसेने तीव्र निषेध केला आहे. मोर्चा नियोजित वेळेत आणि ठरलेल्या ठिकाणीच होणार, असा ठाम इशारा मनसेने दिला आहे. या बाबतची माहिती मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी दिली. 

मराठी आमची आई, आईसाठी कोणताही गुन्हा घेण्यास तयार : अविनाश जाधव

मोर्चा सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होणार असून, मिरा रोड स्टेशन परिसरात त्याची सांगता होणार आहे. या मोर्च्याच्या निमित्ताने मराठी भाषेच्या आणि अस्मितेच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले जाणार आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना म्हटले, मराठी आमची आई आहे आणि आईसाठी कोणताही गुन्हा घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. हा मोर्चा नियोजित वेळेवर आणि ठिकाणी निघणारच असे जाधव म्हणाले. 

पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतायेत, मनसेचा आरोप

याचवेळी, पोलिस कारवाईबाबत मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठी जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप जादव यांनी केला. या मोर्चामुळे  शहरातील राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

सर्व मराठी संघटना, राजकीय पक्षातील मराठी पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र

सध्या मीरा-भाईंदर शहरात मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी सर्व मराठी संघटना, राजकीय पक्षातील मराठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी समाज मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. शहरात मराठी भाषेला दुय्यम स्थान देणे, मराठी व्यक्तींना घर देण्यास नकार देणे, तसेच विशिष्ट समाजाच्या नावाने शहरात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे मराठी जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. 

मिरा भाईंदर शहरात गुजराती मारवाडी समाजाने मराठी माणसा विरोधात/मराठी भाषेविरोधात मोर्चा काढला, आम्ही मराठी बोलणारच नाही, म्हणून भाषा, मराठी माणूस याविषयी अपशब्द बोलले गेले. समाजात तेढ निर्माण केल्याविरोधात "मराठी एकजूट" हा सर्व मराठी पक्ष, पुढारी, संस्था सामान्य मराठी माणूस एकत्र येऊन भव्य असा "मराठी मोर्चा" निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : मनसे-ठाकरेंच्या युतीवर पुन्हा मोठं भाष्य; राज्यात दोनच समविचारी पक्ष; संजय राऊतांच्या विधानाने उंचावल्या भुवया, नेमकं काय म्हणाले?