Bobby Darling On Sex Change : बॉबी डार्लिंग सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या आयुष्यातील संघर्षांमुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

बॉबी डार्लिंग यांनी सांगितले की, त्या जेव्हा दहावीत होत्या, तेव्हाच त्यांना आतून जाणवले की त्या प्रत्यक्षात एक मुलगी आहेत. यावेळी त्यांनी आपल्या लिंगपरीवर्तन (सेक्स चेंज) शस्त्रक्रियेबद्दलही सविस्तर बोलल्या आहेत. लिंगपरीवर्तन शस्त्रक्रियेनंतर जोडीदारासोबत शारीरिक संबंध किती दिवसांनी ठेवता येतात, याबाबतही त्यांनी सविस्तर भाष्य केलंय. 

लिंगपरीवर्तनानंतरचं आयुष्य

सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत बॉबी डार्लिंग यांनी त्यांच्या जन्मापासून ते आजपर्यंतचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या की, 2015 मध्ये लग्न होण्यापूर्वीच त्यांनी लिंगपरीवर्तन केलं होतं.

सर्जरीनंतर काय होतं?

बॉबी डार्लिंग म्हणाल्या, “मी बँकॉकमध्ये माझं सेक्स चेंज ऑपरेशन केलं होतं. या सर्जरीवर माझं सुमारे 10 लाख रुपये खर्च झाले होते. मी जानेवारी महिन्यात ऑपरेशन ठरवलं होतं, तेव्हा त्यापूर्वीच्या सहा महिन्यांपासून मला हार्मोनल गोळ्या घ्याव्या लागत होत्या. दिवसातून तीन वेळा त्या गोळ्या घ्याव्या लागतात.”

सर्जरी किती वेळ चालली?

“मी रात्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले होते. सर्जरी जवळपास 4 ते 5 तास चालली. ऑपरेशननंतर सतत चालत राहावं लागतं, झोपून राहणं परवानगीचं नसतं. यानंतर तुम्हाला लघवीची प्रक्रिया पार पाडावी लागते आणि मग पुढचा टप्पा सुरू होतो. नंतर डॉक्टर एक कृत्रिम अवयव (artificial organ) देतात, जो योनीमध्ये दररोज काही वेळासाठी घालावा लागतो, म्हणजे तिची योग्य रचना व खोली टिकून राहते. ही प्रक्रिया किमान सहा महिने दररोज एक तास करावी लागते. हे रॉड्स वेगवेगळ्या आकारात मिळतात – 6 इंच, 7 इंच, 8 इंच आणि जाडजूडही असतात. हे फायबरपासून बनवलेले असतात.”

पार्टनरसोबत संबंध किती दिवसांनी ठेवता येतात?

बॉबी डार्लिंग यांनी स्पष्ट केलं की, “ही डायलेशन प्रक्रिया सलग 6 महिने केल्यानंतरच तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवू शकता. तेव्हाच शरीर पूर्णतः तयार होतं आणि सर्व काही नैसर्गिक व सामान्य वाटतं. माझं ऑपरेशन मी बँकॉकमध्ये केलं होतं आणि तिथल्या बहुतांश सर्जरी यशस्वी ठरतात.”

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मराठीच्या नावावर हिंदू लोकांना मारणं चुकीचं, हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंवर शाब्दिक हल्ला! VIDEO