Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिला सोशल मीडियावर नेहमी ट्रोलिंगला सामोरं जाव लागतं. गेल्या काही महिन्यात तिला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अनेक ट्रोल करणाऱ्या कमेंट्स आलेल्या पाहायला मिळतात. खासकरुन राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिचं धर्मावरुन देखील मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केलं जातं आहे. याबाबत राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिने भाष्य केलं आहे. (Rajeshwari Kharat)
माझा जन्म ख्रिश्चन कुटुंबातच झाला आहे - राजेश्वरी खरात
राजेश्वरी खरात म्हणाली, माझा जन्म ख्रिश्चन कुटुंबातच झाला आहे आणि मी बालपणापासूनच ख्रिश्चन संस्कारांमध्ये वाढले आहे. मी कधीच धर्म बदललेला नाही. मात्र एक गोष्ट मनाला कायम खटकते — ती म्हणजे लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन खूपच मर्यादित आहे. अनेकांना सत्य जाणून घ्यायची इच्छा नसते, विचार करण्याची सवय नसते. काय दिसतं ते पाहायचं आणि लगेच कमेंट्स करायच्या. आजकाल ट्रोल करणाऱ्यांना प्रसिद्धी हवी असते. हेच लोक पब्लिक कमेंट्समध्ये अपमानास्पद शब्द वापरतात. आणि हे लोक मला खासगीत ‘आय लव्ह यू’, ‘मला तुला भेटायचं आहे’ अशा प्रकारचे मेसेज पाठवतात. जे लोक उघडपणे नकारात्मक बोलतात, तेच गुपचूप अशा प्रकारे वागतात, हे फारच दुर्दैवी असल्याचेही राजेश्वरी खरात हिने सांगितलं. (Rajeshwari Kharat)
धर्म बदलणं हा वैयक्तिक निर्णय असतो - राजेश्वरी खरात
पुढे बोलताना राजेश्वरी खरात म्हणाली, तरीसुद्धा, मी अशा लोकांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा हक्क असतो. धर्म बदलणं हा वैयक्तिक निर्णय असतो, आणि तो निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे एखाद्याच्या श्रद्धेवर किंवा निवडीवर टीका करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. जे लोक सतत इतरांवर टीका करत असतात, त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात काहीतरी कमी असते — कदाचित अपयश, तणाव किंवा स्वतःबद्दलची अस्वस्थता. त्यांना सोशल मीडियावर कमेंट्स करून आपली अस्वस्थता बाहेर टाकायची असते. तुमचं मत असोच, पण ते व्यक्त करताना भाषेचा सन्मान आणि सभ्यपणा ठेवणं गरजेचं आहे," असं मत राजेश्वरी खरात हिने मांडलं.(Rajeshwari Kharat)
इतर महत्त्वाच्या बातम्या
जब्या आणि शालूचं लग्न झालंय का? राजेश्वरी खरात म्हणाली, मला ते सध्या गुपित ठेवायचंय