Karisma Kapoor ex husband sanjay kapur : अभिनेत्री करिश्मा कपूरचा घटस्फोटीत पती आणि उद्योगपती संजय कपूर यांच्या अचानक मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब हादरले आहे. इंग्लंडमध्ये गुरुवारी, 12 जून रोजी पोलो खेळताना त्यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी भारतात होणार असला, तरी ते अमेरिकेचे नागरिक असल्यामुळे त्यांचे पार्थिव भारतात आणण्यात विलंब होत आहे. त्यानंतर आता त्यांच्या संपत्तीच्या वारसदारांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
संजय कपूर यांचे तीन विवाह झाले होते आणि त्यांना चार मुले आहेत. संजय कपूर यांनी 1996 मध्ये फॅशन डिझायनर नंदिता महतानी यांच्याशी पहिल्यांदा लगीनगाठ बांधली होती, मात्र हे नातं केवळ चार वर्ष टिकले. साल 2000 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या विवाहातून त्यांना कोणतेही अपत्य झाले नाही.
करिश्मा कपूरसोबत दुसरं लग्न, दोन मुले आणि विभक्त होण्याची कहाणी
नंदिता महतानीपासून विभक्त झाल्यानंतर 2003 मध्ये संजय कपूर यांनी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत दुसरे लग्न केले. या विवाहातून त्यांना दोन मुले – समायरा आणि कियान – आहेत. मात्र काही वर्षांतच दोघांचे संबंध बिघडले आणि अखेर 2016 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
घटस्फोट घेतल्यानंतर 70 कोटींची पोटगी, 14 कोटींच्या बाँड आणि मालमत्तेचे हस्तांतरण
‘मिड-डे’च्या अहवालानुसार, करिश्मा कपूरला घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी 70 कोटी रुपयांची एलिमनी दिली होती. याशिवाय, खार येथील त्यांच्या वडिलांचे घरही त्यांनी करिश्माच्या नावावर केले. घटस्फोटाच्या वेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता, मात्र नंतर कोर्टाने मुलांची कस्टडी करिश्मा कपूरला दिली आणि खर्चाची जबाबदारी संजय कपूर यांच्यावर टाकली. संजय कपूर यांनी आपल्या दोन्ही मुलांसाठी 14 कोटी रुपयांचा बाँड घेतला होता, ज्यावरून सुमारे 10 लाख रुपयांचा वार्षिक व्याज मिळत असे. तसेच कोर्टाने त्यांना मुलांना भेटण्याची मुभा दिली होती.
तिसरी पत्नी प्रिया सचदेव ठरणार संपत्तीच्या वारसदार
करिश्मा कपूरपासून घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी 2017 मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री प्रिया सचदेवसोबत तिसरे लग्न केले. प्रिया ही आधीपासूनच घटस्फोटित होती आणि तिच्या पहिल्या लग्नातून सफीरा नावाची मुलगी आहे. संजय कपूर आणि प्रिया यांना अजारियस नावाचा मुलगा आहे. संजय कपूर यांच्या खांद्यावर तीन मुले आणि सावत्र मुलगी अशी चार मुलांची जबाबदारी होती.
आता संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव त्यांच्या संपत्तीची मालकीण ठरणार आहे. 13 हजार कोटींच्या साम्राज्याची सूत्रे आता प्रिया सचदेवच्या हाती येणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Shivali Parab : तुझं लोभस हसणं, जणू कमळाच उमलणं; अभिनेत्री शिवाली परबच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस