Rajeshwari Kharat : फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात (RajeshwariKharat) हिने काही दिवसांपूर्वी अभिनेता सोमनाथ अवघडे याच्यासोबत काही खास फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये दोघे एका निळ्या ड्रमजवळ उभे राहिलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील एखाद्या दाम्पत्याप्रमाणे लूक केला होता. काही महिन्यांपूर्वी दोघांनी मुंडवळ्या घातलेला फोटो देखील शेअर केला होता. त्यामुळे दोघांनी शूट केलंय की, लग्न केलंय? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात होता. दरम्यान, राजेश्वरी खरातने (RajeshwariKharat) हिने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केलाय. 

मला थोडासा सस्पेन्स ठेवायचा आहे - राजेश्वरी खरात 

अभिनेत्री राजेश्वरी खरात म्हणाली, आमचं लग्न झालंय की नाही? हा प्रश्न मी सध्या गुपित ठेवते. कारण लग्न झालंय की नाही झालंय? हे पब्लिकला ठरवूद्या..मी सर्वांना काही दिवसांत गूड न्यूज देणार आहे. मला थोडासा सस्पेन्स ठेवायचा आहे.

पुढे बोलताना राजेश्वरी म्हणाली, शूटचा जो विषय आहे. त्याबाबत मला सांगायला आवडेल की, लवकरच सर्वांना चांगले प्रोजेक्ट, स्टोरीज आणि स्क्रिप्ट पाहायला मिळतील. सोमनाथ आणि माझी जी अधुरी कहानी होती ती आता पूर्ण झालेली किंवा काही प्रमाणात अधुरी...मग प्रेम, ड्रामा सगळं पाहायला मिळणार आहे.  त्यामुळे खऱ्या आयुष्यात लग्न झालं आहे की नाही? हे जाणून घ्यायला सर्वांना वाट पाहावी लागेल. 

'धर्म बदलणे ही एक पर्सनल चॉईस आहे'

माझा जन्म ख्रिश्चन घरातचं झालेला आहे. मी लहानपणा पासूनच ख्रिश्चन आहे. मी कोणताही धर्म बदललेला नाही. एक खंत नक्की आहे की, लोकांचा दृष्टीकोण मर्यादित आहे. इतका मर्यादीत आहे की, लोकांना पुढचे सत्य पाहायचं नाही. पाहायचं काही विचार करायचा नाही आणि धडाधड कमेंट्स टाकायचा, असं सुरु आहे. ट्रोलर लोकांना स्पॉटलाईटमध्ये राहायला आवडतं. कमेंट्समध्ये चुकीचं लिहितात आणि आय लव्ह यू , मला तुला भेटायचं आहे, असे  डायरेक्ट मेसेज करतात. ही तिचं लोकं असतात जी कमेंट्समध्ये खराब बोलत असतात. मी त्यांची बाजू समजून घेऊ शकते. प्रत्येकाला प्रत्येकाचं मत असतं. धर्म बदलणे ही एक पर्सनल चॉईस आहे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. लोकांनी टीका करणे चुकीचं आहे. जे लोक टीका करतात, त्यांच्या आयुष्यात टेन्शन आहे. अयशस्वी आहेत, त्यांना सोशल मीडियावर कमेंट्स करण्याची जागा मिळते. तुम्ही योग्य त्या भाषेत बोलू शकतात, असंही राजेश्वरी खरात हिने सांगितलं. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Dharmendra Kissing Scene With Shabana Azmi: 'माझ्या एका किसनं लोक हादरुन गेले...'; 87 वर्षांचे धर्मेंद्र अन् 72 वर्षांच्या शबाना आझमींचा 'तो' लिपलॉक सीन

Third Death Rishabh Shetty Kantara Chapter 1 Set: ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: चॅप्टर 1'च्या सेटवर आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू; याचवर्षी गमावलाय दोघांनी जीव, सेटवर पसरलंय भितीचं वातावरण