Raja Shivaji Box Office Collection:महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित झालेला 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपटातील मराठी सिनेसृष्टीचे अनेक विक्रम मोडत जगभरातून 100 कोटींचा टप्पा वेगाने गाठला. प्रदर्शनाच्या 23 व्या दिवशीही या चित्रपटाची घोडदौड कायम आहे.जेनेलिया देशमुख आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती, रितेश देशमुख यांचे दिग्दर्शन -अभिनय तसेच बॉलीवूड व मराठी मनोरंजन सृष्टीतील दिग्गज कलाकारांची फौज अंगावर शहारे आणणारी अजय अतुलची गाणी, भव्य सेट्स व छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या या महाकाव्याने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली.(Box OfficeCollection)

Continues below advertisement

प्रदर्शनाच्या 23 व्या दिवशी या चित्रपटाने 1.37 कोटी रुपयांचा कलेक्शन केले. या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 111.47 कोटींवर पोहोचले. अखेर चित्रपटाचे नेट कलेक्शन 90.77 कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे या चित्रपटाने आता अधिकृतरित्या सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. (Raja Shivaji Box Office Collection)

'राजा शिवाजी' चित्रपटाची आतापर्यंतची कमाई (Raja Shivaji)

रितेश देशमुख दिग्दर्शित व अभिनित चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या शनिवारी 1.37 कोटी रुपयांचा कलेक्शन केलं. देशभरात 942 शोमधून 26.6% प्रेक्षक संस्थेसह हा चित्रपट पाहिला गेला. बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती असल्यामुळे या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. जेनेलिया देशमुख, संजय दत्त,अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला फक्त भारतातच नाही, तर परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला.

Continues below advertisement

पहिला आठवडा: ₹7.70 कोटीदुसरा वीकेंड: ₹17.40 कोटी11वा दिवस (सोमवार): ₹2.65 कोटी12वा दिवस (मंगळवार): ₹2.75 कोटी13वा दिवस (बुधवार): ₹2.10 कोटी14वा दिवस (गुरुवार): ₹2.10 कोटी15वा दिवस (शुक्रवार):₹ 1.45  कोटी 16 वा दिवस (शनिवार):₹ 2.70 कोटी 17वा दिवस(रविवार): ₹3.45 कोटी 18वा दिवस (सोमवार): ₹1.15 कोटी 19 वा दिवस (मंगळवार):₹1.30 कोटी 20 वा दिवस (बुधवार): ₹1.10कोटी 21वा दिवस (गुरुवार): ₹0.99 कोटी 22वा दिवस (शुक्रवार):₹0.70 कोटी 23 वा दिवस (शनिवार):₹1.37 कोटी 

सैराटचा रेकॉर्ड मोडला

राजा शिवाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवत सर्वाधिक कमाई करणऱ्या सैराट या मराठी चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलाय.

1. राजा शिवाजी: 90.77 कोटी 2. सैराट – 90 कोटी3. बाई पण भारी देवा – 76.28 कोटी4. वेड – 61.2 कोटी5. नटसम्राट – 42 कोटी6. पावनखिंड – 37.72 कोटी7. लई भारी – 37 कोटी8. कट्यार काळजात घुसली – 35 कोटी9. ठाकरे – 31.6 कोटी10. टाइमपास – 30 कोटी

हेही वाचा:

Drishyam 3 Box Office Collection: ‘दृश्यम 3’ नं बॉक्स ऑफिस हादरलं; 48 तासांत 6 सिनेमांना धोबीपछाड, अवघ्या 2 दिवसांत कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले