Tejasswi Prakash Karan Kundrra: टेलिव्हिजनवरचं (Television News) सतत चर्चेत असणारं स्टार कपल सध्या भलतंच चर्चेत आहे. सध्या दोघेही 'देसी ब्लिंग' (Desi Bling) कार्यक्रमात एकत्र काम करणार आहेत. नुकतंच करण कुंद्रा (Karan Kundra) यानं शोमध्ये तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिला लग्नासाठी मागणी घातली. करणनं प्रपोज करताना तेजस्वीला सुंदर अशी हिऱ्यांची अंगठी घातली. आता लवकरच आपलं आवडतं कपल लग्नाच्या बेडीत अडकरणार, हे कळताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दरम्यान, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash Karan Kundrra Live In Relationship) हिनं नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केलेलं आणि आपल्या नात्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केलेला. तेजस्वीच्या आईनं लग्नाआधी त्यांना लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता, तसेच आपल्या मुलीबाबत करणला एक वॉर्निंग देखील दिली होती, असा खुलासा करण कुंद्रानं बोलताना केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

'बिग बॉस 15' मधून झालेली सुरुवात (Tejasswi Prakash Karan Kundrra in Bigg Boss)

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश 'बिग बॉस 15' मध्ये एकत्र दिसले होते आणि याच शोदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली होती. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत आणि चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. मात्र, लग्नाऐवजी करण आणि तेजस्वी हिनं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, दोघांच्या कुटुंबीयांनाही त्यांचं हे नातं मंजूर आहे.

तेजस्वीच्या आईनं दिलेली वॉर्निंग (Tejasswi Prakash Mother Warns Karan Kundrra)

करण कु्ंद्रानं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, तेजस्वीच्या आईनं त्याला लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून दोघे एकमेकांना नीट समजू शकतील. यासोबतच त्यांनी करणला थेट वॉर्निंग देत म्हटलं होतं की, "तेजस्वीचा स्वभाव समजून घेणं आणि तिला सांभाळणं सोपं नाही, त्यामुळे आधी नीट विचार कर..."

तेजस्वीच्या आईचा स्वतःच्या मुलीवरच नव्हता विश्वास

करण आणि तेजस्वी नुकतेच अंगद बेदी आणि नेहा धुपिया यांच्या पॉडकास्टमध्ये एकत्र आले होते. तिथे त्यांनी आपल्या नात्याबद्दल अनेक गमतीशीर गोष्टी शेअर केल्या. करण कुंद्रानं सांगितलं की, "तेजस्वीच्या आईनं मला स्पष्टपणे सांगितलं होतं की, त्यांचा स्वतःच्या मुलीवर अजिबात विश्वास नाही... तिनं मला तेजस्वीबद्दल विचार करण्यासाठी पूर्ण वेळ घेण्याचा सल्ला दिलेला, कारण तिची मुलगी 'ठीक' (नॉर्मल) नाही..."

तेजस्वीच्या वडिलांचा मात्र पूर्ण पाठिंबा

करण कुंद्रानं पुढे असंही स्पष्ट केलं की, तेजस्वीच्या आईला जरी काळजीयुक्त शंका होती, तरी तिच्या वडिलांना मात्र त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अडचण किंवा आक्षेप नव्हता.

"लग्नाआधीच आम्ही लिव्ह-इनमध्ये राहावं, ही आईचीच इच्छा होती..."

तेजस्वी प्रकाश म्हणाली की, "माझ्या आईला हेच हवं होतं की, करणला कंफर्टेबल वाटावं. माझ्या आईनंच सांगितलेलं की, लग्नाचा विचार करण्यापूर्वी आम्ही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहावं... अनेकजण याच्या विरोधात आहेत, पण माझ्या आईचं म्हणणं आहे की, आम्ही एकत्र राहून पाहायला हवं, मगच लग्नाचा विचार करावा..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mahima Chaudhry Daughter Look Alike Hollywood Star: बॉलिवूड सोडून थेट अमेरिकन शोमधून महिमा चौधरीच्या मुलीचा डेब्यू? 'तो' फोटो पाहून कन्फ्युज फॅन्स

ABP माझाच्या बातम्या LIVE...