Raj Kundra case : पोर्नोग्राफी व्हिडीओ प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज कुंद्राला चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये पॉर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. हायकोर्टाने याचिका फेटाळून लावत न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी राज कुंद्राला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर कुंद्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मुंबई हायकोर्टने राजसोबतच सहा लोकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यामध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि अभिनेत्री पूनम पांडे यांच्याही नावांचा समावेश आहे. या प्रकरणात उमेश कामत, सुवोजित चौधरी आणि सॅम अहमद हे तिघेही आरोपी आहेत.
पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. राज कुंद्राविरोधात कलम 292, 293 आणि आयटी कायद्याच्या कलम 66E, 67, 67A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज कुंद्राने त्याचे अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहेत.
संबंधित बातम्या
Dilip Joshi : दिलीप जोशींच्या मुलीचा थाटामाटात पार पडला लग्न सोहळा; सोशल मीडियवर फोटो व्हायरल
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : जेठालालने घेतली आलिशान गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क!