Inflation rate : सर्वसामान्यजणांना अच्छे दिनाची प्रतिक्षा असताना दुसरीकडे महागाईने कंबरडे मोडले आहे. देशातील घाऊक महागाईने मागील 12 वर्षातला उच्चांक गाठला आहे. नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर १४.२३ टक्के इतका होता. इंधन आणि वीजेच्या किंमती वाढल्यानं घाऊक महागाईमध्ये वाढ झालीय. खाण्यापिण्याच्या वस्तू, खाद्यतेल, अंडी, मांस या वस्तूही महागल्यानं घाऊक किंमतीच्या निर्देशांकांत वाढ झाली आहे.
वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. इंधन दरवाढीसोबत खाद्यान्न, भाजीपालासह घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम महागाई निर्देशंकावर दिसून आला.
नोव्हेंबर महिन्यात महागाई दर 14.23 टक्के इतका झाला. तर, त्याआधी ऑक्टोबर महिन्यात हाच निर्देशांक 12.54 टक्के इतका होता. इंधन दरवाढ ही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. मागील महिनाभरापासून इंधन स्थिर आहेत. मात्र, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात इंधन दर वाढले होते. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाईचा निर्देशांक हा ऑक्टोबरमध्ये 37.18 टक्के होता. तर, नोव्हेंबरमध्ये हा दर 39.81 टक्के इतका झाला.
देशातील विविध राज्यांमध्ये आलेल्या नैसर्गिक संकटाचा परिणाम शेतीवरही झाला. त्याच्या परिणामीदेखील भाजीपाला, खाद्यान्नाच्या किंमतीत वाढ झाली. वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी दिवाळीत केंद्र सरकारने इंधनावरील उत्पाद शुल्कात कपात केली होती. त्यामुळे पेट्रोलच्या दरात सरासरी 5 ते 6 रुपये आणि डिझेलच्या दरात सरासरी 10 रुपयांनी कपात झाली होती. केंद्राच्या या निर्णयानंतर काही राज्यांनी व्हॅट कर कमी केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- चंद्रकांत पाटील यांचे अजब वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बॅंक विकसित केली, वाजपेयी-मोदींकडून कळस!
- Corona Vaccination : सहा महिन्यात येणार तीन वर्षांच्या पुढील मुलांसाठी लस, अदर पुनावालांनी दिली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha