Anant Ambani Radhika Merchant Engagement : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या लेकाचा म्हणजेच अनंत अंबानीचा (Anant Ambani) नुकताच राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनंत आणि राधिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 


मीडिया रिपोर्टनुसार, अनंत अंबनीपेक्षा राधिका मर्चंट एका वर्षाने मोठी आहे. राधिका मर्चंटचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी गुजरातमध्ये झाला. तर अनंत अंबानीचा जन्म 10 एप्रिल 1995 रोजी झाला आहे. त्यामुळे राधिका आणि अनंत यांच्या वयात एका वर्षांचं अंतर आहे. राधिका ही अनंत अंबानीची बालमैत्रीण आहे. ती एनकोर हेल्थकेअर (Encore Healthcare) या कंपनीचे सीईओ आणि आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची एकुलती एक मुलगी आहे. राधिकाला शास्त्रीय नृत्याची प्रचंड आवड आहे. 


राधिकाबद्दल जाणून घ्या... (Who is Radhika Merchant?)


राधिकाने मुंबईतील श्री निभा आर्ट अकादमीमध्ये गुरु भावना ठक्कर यांच्याकडून शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मे 2022 मध्ये राधिका मर्चंटसाठी खास अरंगेत्रम सोहळ्याचं आयोजन केलं होतं. राधिकाचे शालेय शिक्षण मुंबईतील इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर 2017 साली न्यूयॉर्क विद्यापीठातून तिने राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. 






राधिकाला नृत्यासह वाचणाची, ट्रेकिंगची आणि पोहण्याची आवड आहे. 2018 साली राधिका आणि अनंत यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहेत. आज राधिका एक लोकप्रिय भरतनाट्यम नृत्यांगना आहे. राधिका ही अंबानी घराण्यातली दुसरी नृत्यांगना आहे. याआधी नीता अंबानी यांनी देखील भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे. 


राधिका आणि अनंत (Radhika Merchant Anant Ambani Wedding) यांच्या साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नसोहळ्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यात उद्योगपती, राजकारणी मंडळींसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. 


संबंधित बातम्या


Anant Ambani Radhika Merchant Engagement: मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा राजस्थानमध्ये झाला रोका, पाहा फोटो!