Mika Singh Charge High Fees For Performance In Anant Ambani Radhika Merchant Engagement: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश  अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा गुरुवारी साखरपुडा झाला आहे. बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) अंनत अंबानी यांचा साखरपुडा झाला आहे. राजस्थानमधील नाथद्वारा येथे श्रीनाथजी मंदिरात साखरपुडा झाल्यानंतर मुंबईतील अँटालिया निवस्थानात सेलिब्रेशन झालं. यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली. अँटालिया येथे झालेल्या सेलिब्रेशनमध्ये प्रसिद्ध गायक मिका सिंह (Mika Singh) याने जबरदस्त परफॉर्म केला. पण तुम्हाला माहितेय का? यासाठी त्याच्यावर पैशांची उधळण झाली. दहा मिनिटांसाठी मिका सिंहने तब्बल दीड कोटी रुपयांचं मानधान घेतल्याचं समोर आलेय.  


मिका सिंह बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांमध्ये आहे. मिकाच्या जबरदस्त आवाजाचे लाखो चाहते आहेत. मिका आपल्या गायनामुळे अनेक पार्ट्यांना चार चाँद लावतो. गुरुवारी रात्री अँटालियामध्ये झालेल्या सेलिब्रेशनमध्ये मिकानं धमाल उडवून दिली. त्याच्या परफॉर्मन्समुळे कार्यक्रामातील उत्साह वाढला.  मिका सिंहचा याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर दुसरीकडे मिकानं यासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतलेय. मिळालेल्या माहितीनुसार, मिका सिंहने 10 मिनिटांच्या परफॉर्मेससाठी 1.5 कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं. याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.





 
 
अँटालियावर कुणी कुणी लावली हजेरी?
राजस्थानमध्ये साखरपुडा झाल्यानंतर अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika merchant) मुंबईतील अँटालिया निवासस्थानी आले होते. येथे ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आले होते.  या पार्टीमध्ये बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि रणबीर कपूर यासारख्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर कलाकारांचे फोटो व्हायरल झाले होते. 


कोण आहे राधिका मर्चंट?
राधिका आणि अनंत खूप दिवसांपासून एकमेकांचे मित्र आहेत. 28 वर्षांची राधिका एक ट्रेंड डान्सर आहे. राधिकाने श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यम शिकलं आहे. राधिकाचं कुटुंब गुजरातमधील कच्छ येथील आहे. राधिकाच्या धाकट्या बहिणीचे नाव अंजली मर्चंट आहे.  राधिकाचा जन्म मुंबईत 18 डिसेंबर 1994 रोजी झाला. तिचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल, जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून घेतलं आहे. राधिका न्यूयॉर्क विद्यापीठातून पॉलिटिक्स आणि अर्थशास्त्रात पदवीधर आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर, 2017 मध्ये राधिका रिअल इस्टेट फर्म Isprava टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून सामील झाली.   2018 मध्ये राधिकाचा अनंत अंबानीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे.