Raada : फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' (Raada) चित्रपटाचे पहिले वहिले गणरायाला साद घालणारे 'मोरया मोरया' (Morya Morya)  गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. गणरायाचे आगमन होताच या चित्रपटातील गणपती बाप्पावर चित्रित झालेले हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. राम शेट्टी निर्मित 'राडा' या चित्रपटातील 'मोरया मोरया' हे गाणे जाफर सागर लिखित असून, गायक जसराज जोशी आणि मधुर शिंदे यांनी त्यांच्या सुमधुर आणि दमदार आवाजात हे गाणे स्वरबद्ध केले आहे. तर, संगीतकार दिनेश अर्जुना यांनी या गाण्याच्या संगीताची धुरा पेलवली आहे. या गाण्यातील नृत्याची जबाबदारी कोरियोग्राफर फुलवा खामकर यांनी उत्तमरीत्या सांभाळली आहे.


गणरायाला वंदन करणारे हे 'मोरया मोरया' हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल. येत्या 23 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'मोरया मोरया' गाण्याने धुमाकूळ घालणारा 'राडा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


पाहा गाणे :



योगिता चव्हाण दिसणार मुख्य भूमिकेत


छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत मुख्य भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) 'राडा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे. राम शेट्टी निर्मित 'राडा' या चित्रपटात ‘अंतरा’ म्हणजेच अभिनेत्री योगिता मुख्य भूमिकेत दिसणार असून, तिचा रावडी आणि मितभाषी असे दोन्ही लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात योगिताचा लव्हेबल अंदाजही प्रेक्षकांना विशेष भावणार आहे. अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तो या चित्रपटात मुख्य नायकाची अर्थात ‘समा’ भूमिका साकारणार आहे.


कलाकारांची मोठी फौज


राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनर आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड,  योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांना पाहणे रंजक ठरणार आहे. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर, हा भव्य अ‍ॅक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. 


हेही वाचा :


Raada : मराठमोळ्या 'राडा'ला मिळालाय साऊथ स्टाईल टच, चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सर्वत्र हवा!


Yogita Chavan : मल्हारची ‘अंतरा’ चित्रपटात झळकणार! ‘राडा’मध्ये दिसणार योगिता चव्हाणचा रावडी लूक