Horoscope Today, September 2, 2022 : आज विशाखा नक्षत्र आहे. चंद्र तूळ राशीत आहे. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे आणि सूर्य सिंह राशीत आहे. मेष राशीच्या लोकांनी आज कोणतेही नवीन काम सुरु करू नका. वृषभ राशीच्या लोकांचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...


मेष (Aries Horoscope) : आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. मात्र, कोणतेही नवीन काम सुरू करू नका. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. वाणी व वर्तनावर संयम ठेवा. कोणाचाही राग करू नका आणि शत्रूंपासून सावध राहा. कोणतेही काम घाईने करू नका. आध्यात्मिक कामांसाठी दिवस चांगला आहे. आज जास्त पैसे खर्च होतील. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.


वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी नवी आव्हाने येऊ शकतात. कामानिमित्त प्रवास करू शकता. व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक प्रकरणे गुंतागुंतीची होऊ शकतात. कलेशी संबंधित लोकांसाठी काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकते. कौटुंबिक वातावरण शांत राहील, पण जोडीदाराशी वाद वाढू शकतात, संयमाने वागा.


मिथुन (Gemini Horoscope) : जर, तुम्ही प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस चांगला ठरेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायलाही जाऊ शकता. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला असेल आणि तुम्ही नवीन लोकांना भेटून तुमच्या कामाचा प्रचार कराल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीच्या ठिकाणी भूतकाळातील चुकांमधून धडा घेऊन तुम्ही चांगला निर्णय घ्याल. धनप्राप्तीच्या संधी मिळतील.


कर्क (Cancer Horoscope) : तुमचे विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद आज तुम्हाला त्रासदायक ठरेल. तुमच्या कौशल्याने काहीतरी मोठे करून यश मिळवू शकता. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यवसायात मोठी संधी मिळू शकते. जर तुम्ही काही मानसिक तणावातून जात असाल, तर आज तुमची त्यातूनही सुटका होईल.


सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. खूप दिवसांपासून रखडलेले कोणतेही काम पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. भांडवल शहाणपणाने गुंतवा. कामाच्या संदर्भात प्रवास करू शकता, जो फायदेशीर ठरेल. व्यापारी वर्गाला नवीन करार मिळतील. आर्थिक लाभाची स्थिती आहे. विद्यार्थ्यांना काही मोठी कामगिरी करता येईल. जुने मित्र भेटतील.


कन्या (Virgo Horoscope) : आज तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल दुविधा असेल. कोणतेही नवीन काम सुरू करू नका. शांत राहा, यामुळे वाद टाळता येतील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागले. दुपारनंतर तुमचा वेळ चांगला जाईल. भावा-बहिणींसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम होईल. प्रेम जीवनात गोडवा राहील.


तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा त्रास होणार नाही. दिवस शांततेत आणि आनंदात जाईल. ऑफिसमध्ये तुम्हाला मनःशांतीचा अनुभव येईल. जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. काही नवीन प्रोजेक्ट हाती घेता येतील. नोकरी व्यवसायात काम पूर्ण होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. मित्रांसोबत वेळ घालवू शकाल.


वृश्चिक (Scorpio Horoscope) : मनात आत्मविश्वास असेल, परंतु संभाषणात संयम ठेवा. आरोग्याबाबत सावध राहा. व्यवसायातून उत्पन्न वाढेल. कामाचा व्यापही वाढेल. जुन्या मित्राशी संपर्क होईल. मनःशांती लाभेल. तुम्हाला अधिक प्रवास करावा लागू शकतो. मित्राच्या मदतीने व्यवसायाला नवी दिशा मिळू शकते. पालकांकडूनही आर्थिक मदत मिळू शकते. अनावश्यक खर्च करणे टाळा.


धनु (Sagittarius Horoscope) : व्यावसायिक क्षेत्रात चांगले काम होईल. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरी करणारे लोक स्वत:ला चांगले दाखवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील, त्यात त्यांना नक्कीच यश मिळेल. कला आणि संगीताशी संबंधित लोकांना आज एखाद्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील कोणत्याही ज्येष्ठ सदस्यासोबत वाद झाला असेल, तर माफी मागून तो सोडवावा लागेल.


मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायात यश मिळेल. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजनेवर काम कराल. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. मित्रांकडूनही लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने आजचा काळ चांगला आहे.


कुंभ (Aquarius Horoscope) : मनात नकारात्मकता येऊ शकते. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. खूप मेहनत करावी लागेल. संभाषणात संयम बाळगा. उच्च शिक्षणासाठी तुम्हाला घर आणि कुटुंबापासून दूर जावे लागेल. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. हाती घेतलेले काम पूर्ण कराल.


मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही मोठ्या योजनेत भांडवल गुंतवण्याआधी नीट विचार करा, अन्यथा तुम्हाला नंतर नुकसान सहन करावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे अयोग्य वर्तन त्रासदायक ठरू शकते. विनाकारण कोणत्याही वादात पडू नका. सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या


Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत


Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय