R Madhavan Trolled : अभिनेता आर माधवन (R Madhavan) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. लवकरच त्याचा रॉकेट्री: द नांबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect)हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आर. माधवन सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. त्यानं एका मुलाखतीमध्ये भारताची लोकसंख्या 25 लाख आहे, असं वक्तव्य केलं. त्यामुळे सध्या आर माधवनला अनेक लोक ट्रोल करत आहेत. 


एका युझरनं आर. माधवनचा व्हिडीओला एक व्हिडीओ शेअर करुन लिहिलं, 'त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नॉन स्टॉप काहीही बोलत आहेत. चित्रपटाचं प्रमोशन करण्याचा दुसरा मार्ग तुम्हाला दिसला नाही का?' आर माधवननं या ट्रोलरला त्याच्या हटके अंदाजानं उत्तर दिलं. तो म्हणाला, 'ईझी ब्रो.. तुम्ही एक खेळाडू आहात. माझी झोप पूर्ण झाली नाही, त्यामुळे मी 250 लाखाच्या ऐवजी 25 लाख म्हणालो. पण तरीही लोकसंख्या मी 1.7 टक्के कमी सांगितली. भावा तुझ्या मनात एवढा द्वेष का आहे? द्वेष हा तुझ्या खेळासाठी चांगलं नाहीये.'






आर. माधवन याचा ‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट 1 जुलै रेजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रॉकेट्री चित्रपटाचा प्रीमियरही झाला. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे कथानक भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. आर माधवन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार असून त्यानं या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 


हेही वाचा: