नागपूर : व्हॉलीबॉल खेळणाऱ्या मुलींना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच त्यांच्यातील कौशल्यवृद्धी व्हावी या उद्देशाने 16 वर्षाखालील मुलींसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे करण्यात येणार आहे. भविष्यातील क्रीडापटू घडविण्याच्या उद्देशाने शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील मुलींनी चाला लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.
व्हॉलीबॉल खेळास राज्यामध्ये एक परंपरा असून विविध जिल्ह्यामधून गावापर्यंत हा खेळ स्पर्धात्मक व मनोरंजानाच्या माध्यमातून खेळाला जातो. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकानुसार आवश्यक खेळाडूंची उंची तसेच प्रशिक्षण व सरावाकडे दुर्लक्ष होते. यामुळे या खेळाचे व खेळाडूंचे वलय कमी होत असून याचा निश्चितच तोटा खेळाडूंसोबतच देशालाही होत आहे. याकरीता व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल खेळ व खेळाडू यांच्या भविष्याचा विचार करुनच खेळाडू शोध प्रक्रीयेतून शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
खेळाडू शोध मोहिमेसाठी शाळा, प्रशाळा, क्रीडा मंडळे, संघटना, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांनी पात्रता पूर्ण करीत असलेल्या खेळाडूंची नावे जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय, नागपूर या कार्यालयात विहित नमुन्यातील माहिती प्रत्यक्ष सादर करावी.
सहभागी होण्यासाठी...
या प्रशिक्षण शिबीरासाठी तामिळनाडूचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी. पांडियन यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार असून विविध स्पर्धात मुलींना खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. खेळाडू 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावी, उंची 175 सें.मी किंवा त्यापुढील, शाळेत शिकत असलेली किंवा नसलेली असावी. उंचीची अट पूर्ण करु शकणाऱ्या खेळाडूंनीच (मुलींनी) अर्ज सादर करावा. खेळाडूची निवड ही निव्वळ खेळाडूंच्या प्राविण्याचा विचार करुन व दिलेल्या अटीनूसार जास्तीत जास्त पाच खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. (01-सेंटर, 02-अटेंकर, 02-युपिर्व्हसल, ब्लॉकर या खेळातील स्थानाप्रमाणे खेळाडूंच्या खेळातील खेळण्याची जागा नूसार असल्यास उत्तम).