Chhaava Third Sunday Box Office Collection: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office) 'छावा' (Chhaava Movie) रिलीज झाला आणि फिल्म इंडस्ट्रीला 2025 मधील सर्वात मोठा ओपनर मिळाला. त्यापूर्वी मोठ्या पडद्यावर कोणत्याही भारतीय चित्रपटानं मोठी ओपनिंग केलेली नव्हती. 'पुष्पा 2' (Pushpa 2) आणि 'मार्को'नंतर बॉक्स ऑफिसला चांगल्या चित्रपटासाठी वाट पाहावी लागली. 

स्काय फोर्स आणि देवापासून ते विदामुयार्ची-थंडेल आणि आझाद-इमरजन्सी ते लव्हयापा-बॅडअस रविकुमारपर्यंत, सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरात आदळले. पण विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेत असा जीव ओतला की, चित्रपटानं काही काळातच अनेक मोठे रेकॉर्ड मोडले. 'छावा'नं अवघ्या 17 दिवसांत 450 कोटींहून अधिक कमाई केली आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर त्सुनामी निर्माण करत आहे.

'छावा'ची बॉक्स ऑफिसवर जादू

'छावा' प्रदर्शित होऊन 17 दिवस झाले आणि तिसऱ्या रविवारी, म्हणजेच, सतराव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटानं पहिलं स्थान पटकावलं. सॅकनिल्कनं दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांनी तिसऱ्या रविवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली, तेव्हा दिसणारे आकडे धक्कादायक होते.

'छावा'नं आतापर्यंतच्या प्रत्येक बड्या चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. फिल्मनं ज्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले, त्यांचं बजेट 'छावा'पेक्षा कित्येक पटींनी अधिक होतं. जाणून घेऊयात ती, कोणती चित्रपटाला 'छावा'नं तिसऱ्या रविवारी पछाडलं. 

'छावा'नं मोडले 10 फिल्म्सचे रेकॉर्ड्स 

'छावा' या टेबलमध्ये प्रभास, शाहरुख खान आणि आमिर खान-रणबीर कपूर यांच्या चित्रपटांना मागे टाकून नंबर वन बनली आहे. खाली दिलेल्या टेबलमध्ये संपूर्ण माहिती अगदी सहज पाहू शकता. 

फिल्म बजेट (कोटींमध्ये) थर्ड संडे कलेक्शन (कोटींमध्ये)
छावा 130 25
पुष्पा 2 500  26.75
स्त्री 2 135 22
बाहुबली 2 250 17.75
गदर 2 60 16.1
जवान 300 13.9
दंगल 90 13.68
एनिमल 200 13.5
पठान 250 12.6
तान्हा जी 150 12.5
पीके 85 11.5

'छावा'नं 2000 कोटींच्या फिल्मला टाकलं मागे 

'छावा'  फक्त 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे, पण, जर आपण इतर 10 चित्रपटांचं एकूण बजेट जोडलं, तर ते सुमारे 2020 कोटी रुपये येतं. म्हणजेच, विकी कौशलच्या 'छावा'नं 2000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या एकूण 10 चित्रपटांना मागे टाकलं आहे. निर्मात्यांनी अजून सतराव्या दिवसाची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतर छावा 'पुष्पा 2' लाही मागे टाकेल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, 'छावा'चं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. चित्रपटात विक्की कौशलसोबत अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेतही दिसत आहे. पुष्पा 2 आणि अ‍ॅनिमलसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग राहिलेली रश्मिका देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. याशिवाय आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection Day 17: सतराव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर 'छावा'चा धिंगाणा; 'बाहुबली'लाही दिला धोबी-पछाड, नव्यानं रिलीज झालेल्या दोन्ही फिल्म्सची हालत खराब