Allu Arjun Became Brand Ambassador : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या आगामी पुष्पा 2 : द राइज चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जूनचा पुष्पा 2 चित्रपट यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट आहे. पुष्पा चित्रपटातील दमदार अभिनयानंतर चाहते पुन्हा एकदा अल्लू अर्जुनला 'पुष्पा'च्या भूमिकेत पाहण्यासाठी सज्ज आहेत. पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. पुष्पा चित्रपटामुळे साऊथ स्टार अल्लू अर्जुनला स्टारडम मिळाला आहे. आता पुष्पा 2 चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याच्या प्रसिद्धीत वाढ झाली असून तो सर्वाधिक कमाई करणार ब्रँड ॲम्बेसेडर ठरला आहे.
'पुष्पा 2' आधीच अल्लू अर्जूनच्या प्रसिद्धीत वाढ!
अभिनेता अल्लू अर्जुन याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुष्पा चित्रपटामुळे अल्लू अर्जूनला भारतातच नाही, तर जगभरात वेगळी ओळख मिळाली आहे. देशविदेशातील अनेक चाहते त्याच्याशी जोडले गेले आहेत. अल्लू अर्जुनची वाढती क्रेझ आणि मागणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिग्दर्शक आणि निर्मातेही त्याच्यामागे वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अल्लू अर्जून आता एक ब्रँड म्हणून नावारुपाला येताना दिसत आहे.
आशियातील सर्वाधिक कमाई करणार ब्रँड ॲम्बेसेडर
अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड पुष्पा 2 चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा 2 : द रुल' रिलीज होण्यापूर्वीच अल्लू अर्जुनची मागणीही एंडोर्समेंट मार्केटमध्ये वाढली आहे. आता सुपरस्टार अल्लू अर्जुन आशियातील सर्वाधिक कमाई करणारा ब्रँड ॲम्बेसेडर बनला आहे. स्टाईल स्टार अल्लू अर्जुनने 'थम्स अप' (Thumbs UP) सारख्या मोठ्या सोडा ब्रँडची ऑफर साईन केली आहे. यासोबतच अल्लू अर्जुन आता आशियातील सर्वात श्रीमंत ब्रँड ॲम्बेसेडर बनला आहे.
अल्लू अर्जुन सर्वाधिक कमाई करणारा ब्रँड ॲम्बेसेडर
अल्लू अर्जुन आता कोल्ड ड्रिंक ब्रँड 'थम्स अप' चा नवा ब्रँड ॲम्बेसेडर बनला आहे. यासोबत अल्लू अर्जुन आशियातील सर्वाधिक कमाई करणारा ब्रँड ॲम्बेसेडर बनला आहे. यावरून त्यांची बाजारात प्रचंड लोकप्रियता आणि क्रेझ दिसून येत आहे. अल्लू अर्जुन हा भारतात आधीच सुपरस्टार आहे, पण आता त्याचा प्रभाव आशियामध्येही मजबूत होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :