Pushpa 2 Box Office Collection Day 30: आज 'पुष्पा 2 : द रूल' रिलीज होऊन 30 दिवस पूर्ण झाले आहेत. या 30 दिवसांत, अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं अनेक बाबतीत अनेक विक्रम रचलेत, मग तो सर्वात मोठा ओपनिंग असो किंवा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कलेक्शन करणारा भारतीय चित्रपट असो.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटानं केवळ रेकॉर्डच केले नाहीत, तर एकापाठोपाठ एक अनेक दिग्गजांचे रेकॉर्ड मोडले देखील आहेत. रिलीज होऊन 30 दिवस झाल्यानंतरही अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर धम्माल करत आहे. 30व्या दिवसाचे चित्रपटाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटानं आजही अनेक नवे विक्रम रचले आहेत. 

दिवस कमाईचे आकडे (कोटींमध्ये)
पहिला दिवस 164.25
दुसरा दिवस 93.8
तिसरा दिवस 119.25
चौथा दिवस 141.05
पांचवा दिवस 64.45
सहावा दिवस 51.55
सातवा दिवस 43.35
आठवा दिवस 37.45
नववा दिवस 36.4
दहावा दिवस 63.3
अकरावा दिवस 76.6
बारावा दिवस 26.95
तेरावा दिवस 23.35
चौदावा दिवस 20.55
पंधरावा दिवस 17.65
सोळावा दिवस 14.3
सतरावा दिवस 24.75 (शनिवार)
अठरावा दिवस 32.95
एकोणीसावा दिवस 13
विसावा दिवस 14.5
एकविसावा दिवस 19.75
बाविसावा दिवस 9.6
तेरावा दिवस 8.75
चोविसावा दिवस 12.5
पंचविसावा दिवस 16
सव्विसावा दिवस 6.8
सत्ताविसावा दिवस 7.7
अठ्ठाविसावा दिवस 13.25
एकोणतिसावा दिवस 5
तिसावा दिवस 3.85
एकूण कमाई 1193.6

पुष्पा 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन

'पुष्पा 2 : द रूल' हा चित्रपट भारतात आणि जगभरात 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. याच्या एक दिवस आधी, चित्रपटाचा पेड प्रीव्यू देखील ठेवण्यात आला होता, ज्या दिवशी चित्रपटानं 10.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. तेव्हापासून चित्रपटानं दररोज किती कमाई केली आणि एकूण कलेक्शन किती आहे, ते सविस्तर पाहुयात... हे कमाई संबंधित आकडे सकाळी 10:50 पर्यंत आहेत आणि त्यामुळे ही कमाई अंतिम नाही. यामध्ये काही बदल होऊ शकतात.

30 व्या दिवशी पुष्पा 2 नं मोडले अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड 

पुष्पा 2 नं रिलीज झाल्यानंतर 30व्या दिवशीही अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटानं 30 व्या दिवशी 1.02 कोटी रुपये आणि जवाननं 1.14 कोटी रुपयांची कमाई केली होती.  बाहुबली 2 ची 30 व्या दिवसाची कमाई 2.25 कोटी रुपये होती. आरआरआरची कमाई 2.16 कोटी होती. आता पुष्पा 2 नं या सर्व चित्रपटांना 30 व्या दिवसाच्या कमाईत मागे टाकलं आहे. 

पुष्पासमोर स्त्री 2 चा रेकॉर्ड मातीमोल 

30 व्या दिवशी 2024 ची ब्लॉकबस्टर मूव्ही स्त्री 2 नं 3.35 कोटी रुपयांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. पुष्पा 2 नं स्त्री 2 च्या कमाईपेक्षा तब्बल 50 लाख रुपये जास्त कमावले आहेत. 

पुष्पा 2 ची स्टारकास्ट आणि बजेट 

पुष्पा 2 चं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे, ज्यांनी 2021 मध्ये 'पुष्पा द राइज' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असून सुमारे 500 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pushpa 2 Worldwide Collection: 'पुष्पा 2'नं मोडले 'बाहुबली 2'चे सर्वच्या सर्व रेकॉर्ड्स; वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर पुष्पाभाऊ अव्वल