Pushpa 2 Actress Sreeleela On Periods: 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2)  फेम अॅक्ट्रेस श्रीलीला (Sreeleela) सध्या तिनं केलेल्या विधनामुळे चर्चेत आहे. मासिक पाळीवरुन (Periods) अभिनेत्रीनं एक भयंकर विधान केलं.  ज्यामुळे ती टीकेची धनी झाली आहे. अभिनेत्रीने एका इव्हेंटमध्ये, महिलांनी मासिक पाळीचे कारण देऊ नये,  असे म्हटले होते.  या कारणामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.  श्रीलीला केवळ एक अभिनेत्रीच नाही तर, डॉक्टरसुद्धा आहे. यामुळे तिनं मासिक पाळीवर केलेल्या  वक्तव्यावरुन तिच्यावर टीकांचा भडिमार होत आहे. श्रीलीला नेमकं काय म्हणाली?  तिच्यावर नेटकऱ्यांकडून टीकांचा पाऊस का होत आहे? पाहूयात.

Continues below advertisement

श्रीलीलाचं मासिक पाळीवरील वक्तव्य चर्चेत (Shreeleela On Periods)

मुंबईच्या डी. वाय पाटील विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतलेली  श्रीलीला, काही दिवसांपूर्वी उस्ताद भगत सिंह या सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये उपस्थित होती.  या इव्हेंटमध्ये अभिनेत्रीने विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच करिअरमधील चढ उतारांबद्दलही माहिती दिली. 'श्रीलीला' होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, असं अभिनेत्री म्हणाली.  'प्रेक्षकांना माझी बहुतांश गाणी  आवडली आहेत. मी मासिक पाळीत असतानाही चित्रीकरण केले आहे, त्यामुळे काही कारणं देत नाहीये'.

श्रीलीलाच्या वक्तव्यावर नेटकरी भडकले (Shreeleela Criticized On Social Media) 

 

Continues below advertisement

'जेव्हा आपण  समानतेबद्दल बोलतो. जेव्हा आपल्याला समानता हवी असते. तेव्हा आपल्याला शारीरिक  अडथळांना बाजूला करत पुढे जावे लागते.  मानसिक असो किंवा शारीरिक, हे काही कारण असू शकत नाही', असं अभिनेत्री म्हणाली. अभिनेत्रीच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.   अनेकांनी तिच्यावर टीकेची तोफ डागली आहे. काहींनी तिचे वक्तव्य असंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे.  कारण मासिक पाळीचा प्रत्येकाचा अनुभव खूप वेगळा असतो. वेदनाही वेगवेगळ्या असतात, असं काहींनी म्हटलं आहे. 

एका नेटकऱ्याने अभिनेत्रीच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं की, 'मला मासिक पाळीचा फार त्रास नाही. पण मी माझ्या मैत्रिणींना पाहिलं आहे.  त्यांना प्रचंड त्रास होतो. माझ्या काही मैत्रिणी वेदनेमुळे अंथरुणातून  उठूही शकत नाही. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो', अशी कमेंट केली आहे. दुसऱ्याने म्हटले की, 'मासिक पाळीच्या काळात तुम्ही उड्या मारू शकता,  याचा असा अर्थ होत नाही की, प्रत्येकजण तसे करु शकते', अशी कमेंट एका युझरने केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अक्षय कुमारसोबतची अभिनेत्री होणार आई? लग्नाच्या 4 वर्षांनंतर देणार बाळाला जन्म? ओढणीनेनं बेबी बंप झाकताना झाली स्पॉट