बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील वृषाली गावंडे या जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका  (Buldhana Crime News) होत्या. दरम्यान २ मार्च २०२६ रोजी त्या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे आपल्या दुचाकीने कर्तव्यावर जात असताना एका चार चाकी मालवाहू वाहनाने त्यांना धडक देऊन अपघातात (Buldhana Crime News) त्यांचं जागीच निधन झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपास करत मृतक वृषाली गावंडे यांच्या पतीनेच एका चार चाकी वाहन चालकाला तीन लाख रुपये सुपारी देऊन वृषालीची अपघातातून हत्या करून घेतली या प्रकरणी पोलिसांनी वृषाली गावंडे यांचा पती, मित्र व वाहन चालक अशा तिघांना अटक केली आहे. (Buldhana News) 

Continues below advertisement

मात्र या गुन्ह्यात सामील असलेले वृषालीचे इतर नातेवाईक अद्यापही मोकाट आहे. पोलीस त्यांना अभय देत आहे का? असा सवाल करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा व प्रख्यात वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करून हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवाव अशी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्याची मागणी केल्याने जिल्ह्यात बुलढाणा पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. (Buldhana Crime News) 

Buldhana Crime News: नेमकं प्रकरण काय?

कारस्थान रचत पतीने आपल्या शिक्षक असलेल्या पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे. अपघाताचा बनाव करत व सुपारी किलरला एक लाखाची सुपारी देत आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा या गावात घडली आहे. 2 मार्च रोजी वृषाली प्रकाश गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळेवर (ZP School) शिक्षिका असलेल्या पिंपळगाव काळे येथे ड्युटीवर जात असताना सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांच्या स्कुटीला अज्ञात वाहन चालकाने धडक दिली होती. यामध्ये वृषाली गावंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. 

Continues below advertisement

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर लोक याठिकाणी पोहोचले तेव्हा वृषाली गावंडे यांच्या मृतदेहाशेजारी बसून त्यांचे पती प्रकाश गावंडे रडत बसले होते. त्यावेळी पोलिसांनाही हा अपघातच वाटला होता. मात्र, नंतर थोडी चौकशी केली असता वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना घातपाताची शंका बोलून दाखवली होती. तेव्हा जळगाव जामोद पोलिसांनी या सगळ्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ घातपाताच्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी वृषाली गावंडे यांच्या स्कुटीला धडक देणारा वाहनचालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. 

मंगेश सूर्यवंशी याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत वृषाली गावंडे या शिक्षिकेचा पती असलेला प्रकाश गावंडे व मध्यस्थी मंगेश चहुळकर (रा.पातुर्डा, तालुका संग्रामपूर) या दोघांनी आपल्याला एक लाख रुपये सुपारी देऊन वृषाली गावंडे यांचा अपघात घडवून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वृषाली गावंडे यांचा पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश चहूळकर या दोघांनाही अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश जवळकर या दोघांनी टाटा पिकप चालक असलेला मंगेश सूर्यवंशी याला एक लाख रुपये देऊन स्वतःच्याच पत्नीचा अपघात घडवून आणण्यास सांगितले. 2 मार्च रोजी सकाळच्या सुमारास शिक्षिका वृषाली गावंडे या शाळेवर आपल्या दुचाकीने जात असताना मंगेश सूर्यवंशी याने पातुर्डा ते कवठळ दरम्यान वृषालीच्या दुचाकीला धडक मारून तिला जागीच ठार केलं.