Punjabi Composer Bunty Bains : लोकप्रिय संगीतकार आणि सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांचा मित्र बंटी बेन्स (Bunty Bains) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली. पंजाबमधील मोहाली येथील एका रेस्टॉरंटमध्ये बंटी बसला असताना काही अज्ञातांनी तयांच्यावर गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात बंटी बेन्स थोडक्यात बचावला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. 

Continues below advertisement


वृत्तांनुसार, या गोळीबाराच्या घटनेनंतर बंटी बेन्सला धमकीचा फोन आला होता. हल्ला करणाऱ्या टोळीने एक कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती. बंटी बेन्सवर हा हल्ला मोहालीतील सेक्टर-79 मध्ये झाला. संगीतकार असलेला बंटी हा दिवंगत गायक सिद्धू मूसवाला यांचा जवळचा मित्र आहे.  मुसवालाच्या गाण्यांना बंटी संगीतबद्ध करायचा. दोन वर्षांपूर्वी 29 मे 2022 रोजी सिद्धू मूसवाला यांच्यावर गोळीबार झाला होता, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.






लकी पटियाला टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली


बंटी बेन्सने सांगितले की, गोळीबारानंतर लगेचच एक कोटी रुपयांच्या खंडणीचा फोन आला होता. पैसे न दिल्यास जीव गमवावा लागेल, अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली असल्याचे त्याने सांगितले. मोस्ट वॉन्टेड गँगस्टर लकी पटियाल याच्या नावाने आपल्याला हा कॉल करण्यात आल्याची माहिती बंटीने दिली. लकी पटियाल हा सध्या कॅनडामध्ये आहे. लकी पटियाल आणि लॉरेन्स बिश्नोई एकमेकांच्या विरोधात असल्याचं बोललं जातंय. लकी बंबिहा या टोळीचे नेतृत्व करतो.






मुसेवालाचे काम बंटीच्या कंपनीकडे


या हल्ल्याप्रकरणी संगीतकार बंटी बेन्सने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पंजाब पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बंटी बेन्स हा सिद्धू मुसावालाचा अगदी जवळचा मित्र म्हणून ओळखला जातो. सिद्धूच्या अनेक गाण्यांना त्याने संगीतबद्ध केले होते.पण त्यांच्या कंपनीने सिद्धू मुसावालाचे कामही सांभाळले होते.