Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकानं नुकतेच तिचे 'सोना होम' नावाच्या होमवेयर कलेक्शन लाँच केलं आहे. हे कलेक्शन तिनं 22 जून 2022 मध्ये लाँच केलं. मनीष गोयल हा  या बिझनेसमध्ये  प्रियांकाचा पार्टनर आहे. सोना होम या नव्या बिझनेसमुळे प्रियांका सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. प्रियांकाचे न्यूयऑर्कमध्ये सोना नावाचे हॉटेल देखील आहे. 'सोना होम' (Sona Home) या प्रियांकाच्या कंपनीच्या कलेक्शनमध्ये टेबल लिनेन, टेबल क्लॉथ, डिनर सेट, कप यांसारख्या वस्तू ग्राहकांना मिळतील. प्रियांकाच्या 'सोना होम' या कंपनीच्या कलेक्शनमधील वस्तूंच्या किंमतींमुळे सध्या प्रियांकाला अनेक नेटकरी ट्रोल करत आहेत. 


'सोना होम' मधील वस्तूंच्या किंमती
प्रियांकाच्या 'सोना होम' या कंपनीचा कप हा ग्राहकांना  3, 471 रुपयांना मिळणार आहे तर बशीची किंमत 5, 365 रुपये आहे. टेबल क्लॉथची किंमत ही 30, 612 रुपये आहे. 4,733 रुपयांचा डिनरसेट देखील 'सोना होम' च्या कलेक्शनमध्ये आहे. तसेच 'सोना होम'च्या सर्व्हिंग बाऊलची किंमत 7 हजार 732 रुपये आहे.






'मला एवढं श्रीमंत व्हायचंय की मी, सोना होमचा 30 हजारांचा टेबल क्लॉथ खरेदी करु शकेल', अशी पोस्ट करत एका नेटकऱ्यानं सोना होमच्या कलेक्शनमधील वस्तूंच्या किंमतींना ट्रोल केलं. 






प्रियांकाची सिटाडेल ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. तसेच प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. तसेच कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.


हेही वाचा: