Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाचा चाहता वर्ग मोठा आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) हे सेरोगसीद्वारे आई-बाबा झाले. निक आणि प्रियांकानं त्यांच्या लेकीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास' असं ठेवलं. मुलीच्या जन्मानंतर प्रियांका आणि निकनं 100 दिवसांनंतर एक पोस्ट शेअर केली. मालती तिच्या जन्मानंतर 100 दिवस एनआयसीयूमध्ये होती. याबाबत प्रियांका आणि निकनं पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली होत. एका मुलाखतीमध्ये निक जोनासनं मुलीबाबत केलेल्या पोस्टबद्दल सांगितलं.
मुलाखतीमध्ये निक जोनसनं सांगितलं की,' मला वाटतं की जे आम्हाला जाणवते ते आम्ही सोशल मीडियावर सांगतो. ज्या लोकांनी या हॉस्पिटल जर्नीमध्ये आमची मदत केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो.'पुढे तो म्हणाला, 'आम्हाला वाटलं की आमचा हा प्रवास लोकांसमोर आम्ही मांडला पाहिजे. ज्या गोष्टींच्या सामना आपण करत असतो त्या लोकांसमोर मांडल्यावर कळतं की आपल्यासोबत देखील काही लोक आहेत. '
निक म्हणाला, 'प्रियांका पर्फेक्ट पार्टनर'
निकनं मुलाखतीमध्ये सांगितलं, 'प्रियांका ही पर्फेक्ट पार्टनर आहे. ती एका रॉक सॉलिडसारखी संकटांना समोरी जाते. ' 'मदर्स डे' ला प्रियांकानं मालतीसाठी खास पोस्ट शेअर केली होती. प्रियांका ही तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.
प्रियांकाची सिटाडेल ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. प्रियांका गेले काही दिवस या सीरिजचे शूटिंग करत आहे. या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. तसेच प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. तसेच कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
हेही वाचा :