Priyanka Chopra kissed Nick Jonas video : अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हिने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील स्वत:ला सिद्ध केलंय. (Priyanka Chopra kissed Nick Jonas video) दरम्यान प्रियांका सोशल मीडियावर देखील तेवढीच सक्रिय असते. दैनंदिन आयुष्यात काय चाललंय? याबाबतची माहिती ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (Priyanka Chopra kissed Nick Jonas video) सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. प्रियांका इन्स्टाग्रामवर आपल्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील सुंदर क्षणही चाहत्यांसोबत शेअर करताना पाहायला मिळते. 

दरम्यान, प्रियांकाने आता पती निक जोनाससाठी आपले प्रेम व्यक्त केले. तिने निकसोबतचा एक अतिशय खास व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये दोघं समुद्रकिनारी प्रेमळ क्षण अनुभवताना दिसतात. सुरुवातीला निक बीचवर एकटा उभे असतो. त्यानंतर प्रियांका त्याच्याजवळ येते. तो तिला उचलून घेतो आणि किस करतो. प्रियांका आणि निक जोनसने दोघांचा समुद्रकिनाऱ्यावरील हा व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केलाय. त्यांच्या लूकबद्दल सांगायचं तर, त्यांनी काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले आहेत आणि लाल रंगाची कॅपही घातलेली आहे.

या व्हिडिओला ऑडिओ म्हणून बँड 'जोनास ब्रदर्स'चा नवं गाणं 'I Can’t Lose' लावण्यात आलंय. जसं गाण्याचा बीट वेग घेतो, प्रियांका धावत निककडे येते आणि त्याला घट्ट मिठी मारते. या वेळी स्क्रीनवर लिहिलं येतं - 'With her!' आणि काही आनंदी इमोजीही दिसतात.

हा रोमँटिक व्हिडिओ निकने आधी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, जो प्रियांकाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर पुन्हा शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, 'Mine,' म्हणजेच 'तू माझा आहेस.' त्याच वेळी पॉप सिंगर निकने या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, 'I don’t wanna lose you,' म्हणजेच 'मी तुला गमवू इच्छित नाही.'

प्रियांका आणि निक यांनी मे 2018 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये साखरपुडा केला. डिसेंबर 2018 मध्ये त्यांनी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केलं. त्यांनी एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करत दोन्ही पद्धतीने विवाह केला. एक हिंदू रीतिरिवाजानुसार आणि दुसरा ख्रिश्चन पद्धतीने. या जोडप्याने 2022 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आपल्या पहिल्या कन्येचे मालती मेरी चोप्रा जोनास स्वागत केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ghanshyam Darwade Talk About His Health: 'मला जन्मापासूनच लिव्हर, फुफ्फुसं आणि किडनीचा त्रास...'; पाणावलेल्या डोळ्यांनी घनःश्याम दरवडेनं सगळंच सांगितलं