Ghanshyam Darwade Talk About His Health: बिग बॉस मराठी (Bigg Boss) फेम छोटा पुढारी (Chota Pudhari) नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याच्या मृत्यूच्या खोट्या अफवा पसरवण्यात आलेल्या, त्यानंतर छोटा पुढारी म्हणजेच, घनःश्याम दरवडेचं (Ghanshyam Darwade) आक्रमक रुप अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं. अनेकदा घनःश्यामला त्याच्या उंचीवरूनही ट्रोल केलं जातं. अशातच आता घनःश्यामनं एका मुलाखतीत बोलताना त्याची उंची आणि बालपणात त्याला उद्भवलेला किडनी, लिव्हर आणि फुफ्फुसांच्या त्रासाबाबत भावूक होऊन भाष्य केलं आहे. मी सहा वर्षांचा होईपर्यंत हॉस्पिटलमध्येच होतो. कारण, मला जन्मत:च काही त्रास होता, असं घनःश्याम म्हणालेला. 

मुलाखतीत बोलताना घनःश्याम खूपच भावूक झालेला, तसेच, मला लिव्हर आणि किडनीचा त्रास होता, अजूनही आहे, असं त्यानं सांगितलं. माझी उंची कमी असल्यामुळे गावी मला डावललं जायचं, पण त्यावर मात करीत मी पुढे आलो, असंही भावूक झालेल्या घनःश्यामनं स्वतःला सावरुन सांगितलं. 

घनःश्याम दरवडे काय म्हणाला? 

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखती बोलताना घनःश्याम दरवडे म्हणाला की, "माझं बालपण हॉस्पिटलमध्येच गेलं आहे. त्यामुळे माझं बालपण आणि तरुणपण आता सुरू आहे. मी सहा वर्षांचा होईपर्यंत हॉस्पिटलमध्येच होतो. कारण, मला जन्मत:च काही त्रास होता. मला लिव्हर आणि किडनीचा त्रास होता, अजूनही आहे. माझी उंची कमी असल्यामुळे गावी मला डावललं जायचं, पण त्यावर मात करीत मी पुढे आलो."

"मला लोकांनी स्वीकारलं नसलं तरी माझ्या आई-वडिलांनी माझा स्वीकार केला. त्यामुळे मी आता जे काही आहे, ते त्यांच्यामुळेच आहे. सातवीत असताना मला माझ्या आजारपणाबद्दल कळलं. माझ्या वयाच्या सगळ्यांची उंची वाढत होती. त्यामुळे मी माझ्या आई-वडिलांना याबद्दल वारंवार विचारायचो, पण माझे आई-वडील मला तेव्हा काहीही सांगत नव्हते. माझी सहनशक्ती संपली. त्यामुळे मी थेट डॉक्टरांनाच याबद्दल विचारलं. कारण- एकीकडे मला समाजाचा त्रास होता आणि त्यात घरचेही काही सांगत नव्हते. त्यामुळे मी थेट डॉक्टरांना विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, मला आनुवंशिकतेचा त्रास आहे. तेव्हाच मला थायरॉईडचा त्रास होता. लिव्हर आणि फुप्फुसांना सूज आहे. मी आजही इंजेक्शन घेतो. कारण, माझं रक्त आपोआप तयार होत नाही. रक्त शुद्ध करण्यासाठी मला इंजेक्शन घ्यावं लागतं. त्यात मला क्रिएटीन आहे, त्यामुळे माझ्या किडनीलाही त्रास आहे.", असं घनःश्यामने पुढे सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mahesh Tilekar Revealed Truth Of Marathi Film Industry: नावाजलेली अभिनेत्री आईला 'आई-बहिणीवरून' शिव्या घालते; प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकाचा खळबळजनक खुलासा