Jannik Sinner win Wimbledon 2025 : इटलीचा टेनिसपटू यानिक सिनर याने विम्बल्डन 2025 चं विजेतेपद पटकावत मोठा इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात त्याने स्पेनच्या कार्लोस अल्काराजला 4-6, 6-4, 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये पराभूत केलं आणि पहिल्यांदाच विम्बल्डन ट्रॉफी आपल्या नावावर केली. हे सिनरचं पहिलं विम्बल्डन आणि चौथं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं आहे.
या शानदार कामगिरीमुळे सिनरवर पैशांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. त्याला विजेतेपदासाठी सुमारे 35 कोटी रुपये मिळाले. तर दुसरीकडे, अंतिम फेरीत हरलेला अल्काराजही रिकामा परतला नाही, त्यालाही सुमारे 17 कोटी रुपयांचं पारितोषिक मिळालं. या विजयामुळे यानिक सिनर विम्बल्डन जिंकणारा पहिला इटालियन पुरुष खेळाडू बनला आहे. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्याने टेनिस जगतात आपली छाप पाडली आहे. टेनिससारख्या खेळात केवळ मेहनतच नव्हे तर यशाबरोबर मिळणारा प्रचंड पैसाही सर्वांचं लक्ष वेधून घेतो, आणि यंदा सिनरने दोन्ही गोष्टी आपल्या नावावर केल्या.
IPL फायनल जिंकणाऱ्या पेक्षा खूप जास्त...
टेनिस खेळाडूंना खूप पैसा मिळतो. जसं की भारतात जून महिन्यात IPL फायनल जिंकल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) टीमला 20 कोटी रुपये मिळाले होते. पण विम्बल्डन जिंकणाऱ्याला RCB च्या बक्षीसापेक्षा खूप जास्त पैसा मिळाला आहे.
या वर्षी विम्बल्डनच्या विजेत्याला मिळालेली 35 कोटी रुपये ही रक्कम त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी पारितोषिक रक्कम ठरली आहे. यानिक सिनरसारख्या युवा आणि दमदार खेळाडूला देखील या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी मोठे आर्थिक बक्षीस मिळाले आहे, जे त्यांच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. विम्बल्डनमध्ये फक्त विजेत्यालाच नव्हे तर अंतिम फेरीत हारलेल्या आणि इतर भागधारकांनाही आकर्षक रक्कमा दिल्या जातात, ज्यामुळे टेनिस क्षेत्रातील स्पर्धात्मकता आणि गुणवत्ता टिकून राहते.
हे ही वाचा -
