Priyanka Chopra Nick Jonas Oscars after party photos: सध्या 98व्या अकादमी पुरस्काराची चर्चा रंगली आहे. या सोहळ्यात जगभरातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. मुख्य म्हणजे या सोहळ्याची खास लाईमलाईट देसी गर्ल प्रियांका चोप्रा ठरली. दरम्यान, ऑस्करसारख्या जागतिक पुरस्कार सोहळ्यात अवॉर्ड प्रदान करणारी प्रियांका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. यावेळी तिनं जेविअर बार्डेम यांच्यासोबत 'सेंटिमेंटल व्हॅल्यू'ला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म अवॉर्ड प्रदान केला आहे. प्रियांकाने ऑस्करच्या आफ्टर पार्टीची झलकही शेअर केली आहे. या फोटोंमध्ये प्रियांकाचा सिल्व्हर ड्रेसवर क्लासी अंदाज पाहायला मिळत आहे. तर, प्रियांका चोप्राचा पती निक जोनास पियानो वाजवताना दिसत आहे.
माहितीनुसार, लॉस एंजेलिसमध्ये डॉल्बी थिएटरमध्ये या वर्षीचा ऑस्कर सोहळा पार पडला. या खास दिमाखदार सोहळ्याचे सुत्रसंचालन लेट-नाइट होस्ट कॉनन ओ ब्रायन यांनी केले. त्यांनी 2025 सालीही हा खास शो होस्ट केला होता. या कार्यक्रमाला होस्ट करण्यापूर्वी अभिनेत्रीने सोहळ्यातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रेड कार्पेटवर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एकत्र सुरेख दिसत होते. प्रियांकाने ऑस्कर सोहळ्यासाठी व्हाइट गाऊन घातला होता. तर, निकने मखमली काळ्या रंगाचा सूट घातला होता. आफ्टर पार्टीचेही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका आपल्या पतीसोबत दिसत आहे. तिनं सिल्व्हर रंगाचा गाऊन घातला आहे. तर, निक जोनासने क्रिम कलरचा सूट परिधान केलाय. प्रियांकाने या सिल्व्हर ड्रेसवर मिनिमल मेकअप लूक कॅरी केला. तर, स्मोकी आईजमुळे ती अधिक सुंदर दिसत होती.
एका फोटोमध्ये प्रियांकाच्या आजूबाजूला काही मेकअप आर्टिस्ट दिसत आहे. तर, एका फोटोमध्ये निक पियानो वाजवत आहेत. तर, प्रियांकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून पोज दिला आहे. प्रियांकाने पायऱ्यांवर फोटोशूट केला आहे. ऑस्कर सोहळ्यातील तसेच आफ्टर पार्टीचे फोटो प्रियांकाने सोशल मीडियात शेअर केले आहे. सध्या तिची पोस्ट व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
जॅकलीन फर्नांडिसकडून आईच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; आठवणीत अभिनेत्री भावूक, Photo व्हायरल
सलमान खानच्या वडिलांना मिळाला डिस्चार्च; 1 महिन्यांनंतर घरी परतले, कोणता झालेला आजार?
