Priyadarshan Jadhav :  विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला अभिनेता प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) हा आता एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियदर्शन हा लवकरच शक्तिमान या सिनेमात झळकणार आहे.हा सिनेमा 24 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. या सिनेमात प्रियदर्शनसह आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि स्पृहा जोशीही (Spruha Joshi) मुख्य भूमिकेत आहेत. सध्या हा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तिन्ही कलाकार व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. कलाविश्वात कलाकार म्हणून वावरत असलेली ही मंडळी खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकांचे घट्ट मित्रही असतात. अशाच एका मित्राचा किस्सा प्रियदर्शनने नुकताच शेअर केला आहे.


प्रियदर्शन जाधव याने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने त्याच्या एका जवळच्या मित्राचा किस्सा शेअर केला आहे. यावेळी प्रियदर्शनला तू कधी कोणाच्या आयुष्यात शक्तिमान झाला आहेस का किंवा तुझ्या आयुष्यात कोणी शक्तिमानसारखी भूमिका साकारली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रियदर्शन त्याच्या इंडस्ट्रीतल्या एका खास मित्राचा किस्सा शेअर केला. 


प्रियदर्शनने काय म्हटलं?


प्रियदर्शनने त्याच्या मित्राचा किस्सा सांगताना म्हटलं की, 'मी नाव नाही घेणार, माझा इंडस्ट्रीतला अत्यंत जवळचा मित्र आहे. तो देखील आज यशाच्या शिखरावर आहे. आम्ही 21 वर्षांपूर्वी ट्रेनमधून निघालो होतो. तेव्हा त्याने मला ट्रेनमधून उतरल्यानंतर पटकन बाजूला घेतलं आणि खिशातून एक मोबाईल काढला. त्यावेळी मोबाईल असणं ही खूप मोठी गोष्ट होती, तेव्हा तो मला म्हणाला, अरे मला राहवलं नाही म्हणून मी हा मोबाईल चोरला.तो होता टेबलवर मला राहवलं नाही आणि तो मी चोरला. आता मला त्याचं खूप गिल्ट वाटतंय आता काय करायचं असा प्रश्न त्याने मला केला.' 


पुढे प्रियदर्शन म्हणाला की, 'त्यानंतर आम्ही तो फोन सुरु केला.एका तासाभाराने त्याच्यावर रिंग आली आणि आम्ही तो उचलला. मी त्या मित्राला सांगितलं की,खरं सांग की तू हा मोबाईल चोरला आहेस. तुला जर हे गिल्ट घालवायचं असेल, तर त्याला काय ते खरं सांग आणि आम्ही तो आता द्यायला येतो असं त्याला मी सांगायला सांगितलं. त्यावर तो मला म्हणाला नाही नाही मी असं नाही सांगणार आपण फोन देऊ मी सांगतो सापडला म्हणून. मी त्याला तेव्हा म्हटलं, सापडला आणि चोरलामध्ये फरक आहे.अर्थात तो ते बोलू शकला नाही. त्यानंतर आम्ही त्या माणसाला भेटून फोन दिला. तेव्हापासून आमच्यात एक फार छान नातं आहे.' 


ही बातमी वाचा : 


Crime News : 'कपिल शर्मा शो'मध्ये काम मिळवून देतो सांगून घरी नेलं अन् सर्वस्व लुटलं; विवाहितेवर अत्याचार; घटनेने सिनेसृष्टी हादरली