Prithviraj : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) पृथ्वीराज (Prithviraj) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील सेटनं तसेच कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. 


अक्षय कुमारनं या चित्रपटामध्ये पृथ्वीराज ही प्रमुख भूमिका साकारली असून या चित्रपटामध्ये मानुषी छिल्लरनं संयोगिता ही भूमिका साकारली आहे. संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा या कलाकारांनी चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 3 जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


 पृथ्वीराज या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. यश राज फिल्म्सनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाचे कथानक हे राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 



 मानुषी छिल्लर या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 




हेही वाचा :