Prem Chopra Admitted In Lilavati Hospital: बॉलिवूडचे (Bollywood News) ही-मॅन धर्मेंद्र (He-ManDharmendra) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकीकडे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत. अशातच आता चाहत्यांची चिंता आणखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. आणखी एक बॉलिवूड दिग्गजाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते (Bollywood Actor) प्रेम चोप्रा (Prem Chopra) यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital in Mumbai) दाखल करण्यात आलं आहे. 90 वर्षांच्या अभिनेत्याला हृदयविकाराचा (Heart Disease) त्रास होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, त्यातच त्यांना फुफ्फुसांचा संसर्ग (Lung Infection) झाला. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा यांची प्रकृती 10 नोव्हेंबर 2025 रोजी अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलेलं. 90 वर्षीय अभिनेत्यावर डॉक्टर नितीन गोखले आणि जलील पार्कर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

शरीरात पसरलंय इन्फेक्शन 

मीडिया रिपोर्टनुसार, प्रेम चोप्रा यांच्या शरीरात इन्फेक्शन पसरल्याचं वृत्त आहे. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम चोप्रा पुढील दोन ते तीन दिवस रुग्णालयातच राहणार आहेत. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. 

Continues below advertisement

प्रेम चोप्रा यांच्या निधनाच्या पसरल्यात अफवा 

काही वर्षांपूर्वी प्रेम चोप्रा यांच्या मृत्यूची खोटी अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यावेळी, अभिनेत्यानं स्वतः एका मुलाखतीत सांगितलेलं की, त्यांना काहीही झालेलं नसून ते अगदी ठणठणीत आहेत. ते म्हणाले की, "लोक विनाकारण अशा खोट्या अफवा पसरवतात, ज्यामुळे कुटुंब आणि मित्रांना अनावश्यक चिंता वाटते..." त्यानंतर अभिनेत्यानं अशा अफवांना आळा घालण्याचं आवाहन केलंय.

एका डायलॉगमुळे इंडस्ट्रीत मिळाली ओळख 

प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत शेकडो बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं. अनेक आठवणीत राहतील अशा भूमिका प्रेम चोप्रा यांनी रुपेरी पडद्यावर साकारल्या. त्यांचे डायलॉग्स, त्यांची स्टाईल आजही प्रेक्षकांना आठवते. 'बॉबी' चित्रपटातील त्यांचा प्रसिद्ध डायलॉग, 'प्रेम नाम है मेरा... प्रेम चोप्रा' आजही सर्वांच्या ओठांवर आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानलं जातं. 2023 मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.

धर्मेंद्रही रुग्णालयात दाखल 

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. सुरुवातीला त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं आणि ते व्हेंटिलेटरवर असल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यांच्या मुलींनाही अमेरिकेतून विमानानं घरी आणण्यात आलं होतं. दरम्यान, नंतर त्यांच्या टीमनं पुष्टी केली की, ते आता बरे आहेत आणि आता व्हेंटिलेटरवर नाहीत.