Horoscope Today 11 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 11 नोव्हेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या् कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज महत्त्वाकांशा वाढेल, नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज हुद्दा मानसन्मान कीर्ती वाढेल, सरकारी नोकरीमध्ये उच्चाधिकार मिळेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यासाठी त्याग करावा लागेल, त्यामुळे एक प्रकारची अलिप्तता वागण्या बोलण्यात येईल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज छोटी नागमोडी वाट कालांतराने ध्येयाच्या रस्त्याकडे घेऊन जाते, या विश्वासाने चालत राहिलात तर बरच काही साधून जाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज महिलांच्या अपेक्षा लगेच पूर्ण होऊ शकणार नाहीत, नोकरीच्या ठिकाणी फायदा होईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज स्वतःला किती त्रास झाला तरी, प्रतिकूल परिस्थितीशी झगडा द्याल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने थोडे त्रास उत्पन्न होतील, परंतु जबरदस्त आत्मविश्वास ठेवलात तर धीराने पुढे जाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तापटपणाने अहंकार या दोन गोष्टींपासून जेवढे लांब राहाल तेवढे चांगले
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज स्वतंत्र विचारामुळे नोकरीत वरिष्ठांशी जमणार नाही, सतत नाविन्य शोधण्याकडे कल राहील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज मुलांच्या खोडकर वागण्यामुळे वृद्धांना त्रास होईल, स्थावर इस्टेटिसंबंधीचे प्रश्न नव्याने निर्माण होतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश येईल, महिला घरातील कामात अडकून जातील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज आपण स्वावलंबी असले पाहिजे, यावर तुमचा कटाक्ष राहील आणि त्याप्रमाणे कार्य कराल.
हेही वाचा
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा कसा जाणार? कोण होणार मालामाल? पैसा, प्रेम, करिअर? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)