Guss Bollywood Actress Name: बॉलिवूडमध्ये (Bollywood) अशा अनेक अभिनेत्री (Bollywood Actress) आहेत, ज्या लग्न न करता आई झाल्या आहेत. काही जणी लग्नाआधीच गर्भवती राहिल्या आणि त्यांना मूल झालं, तर काहींनी लग्नाआधीच मूल दत्तक घेतलं. यांच्यापैकी अशी एक अभिनेत्री आहे, जिनं एकाच वेळी एक-दोन नाही तर 34 मुलांना दत्तक घेतलं. ऐकून आश्चर्याचा धक्का बसला ना? या अभिनेत्रीबद्दल आणखी एक धक्का देणारी बाब म्हणजे, हिनं 600 कोटींची संपत्ती नाकारली. जाणून घेऊयात, ही अभिनेत्री जिनं अब्जावधींच्या मालमत्ता नाकारली आणि लग्नाआधीच 34 चिमुकल्यांची आई बनली.
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती म्हणजे, बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असणारी प्रीती झिंटा. दिवंगत बॉलिवूड चित्रपट निर्माते कमाल अमरोही यांचा मुलगा शानदार अमरोही प्रीती झिंटाला आपली मुलगी मानायचे. 2011 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांनी प्रीतीला दत्तक घेतल्याची बातमी आली. पण अभिनेत्रीनं या गोष्टी नाकारल्या होत्या. ती म्हणाली होती की, मी शानदार अमरोही यांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत केली होती, मला कोणीही दत्तक घेतलेलं नाही.
600 कोटी रुपयांची संपत्ती नाकारली
असं म्हटलं जातं की, शानदार आमरोही यांना त्यांची 600 कोटी रुपयांची प्रॉपर्टी प्रीतीच्या नावावर करायची होती. पण प्रीतीनं स्पष्ट नकार दिला. मी काही रस्त्यावर पडलेली नाही, की मला दुसऱ्याची मालमत्ता घ्यावी लागेल, असं म्हणत प्रीतीनं थेट संपत्ती धुडकावली होती. दुसरीकडे त्याचवेळी शानदार यांच्या मुलांमध्ये त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवरुन वाद सुरू होते.
2009 मध्ये प्रीतीनं 34 मुली दत्तक घेतल्या
2009 मध्ये प्रीती झिंटानं तिच्या 34 व्या वाढदिवशी एक मोठा निर्णय घेत, 34 मुलींना दत्तक घेतलं. अभिनेत्रीनं ऋषिकेशमधील मदर मिरॅकल अनाथाश्रमातील 34 मुलींना दत्तक घेतलं आणि प्रीतीनं त्यांची संपूर्ण जबाबदारी स्विकारली. अभिनेत्री स्वतः त्यांच्या जेवणाचा आणि इतर सर्व खर्च करते.
2016 मध्ये बांधली लग्नगाठ
2016 मध्ये, प्रीतीनं जीन गुडइनफ या अमेरिकन व्यक्तीशी लग्न केलं, जो तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे आणि तो एक फायनान्स एनालिस्ट आहे. त्यानंतर प्रीती अमेरिकेत स्थलांतरित झाली. लग्नानंतर, दोघेही 2021 मध्ये सरोगसीद्वारे जय आणि जिया या जुळ्या मुलांचे पालक झाले. आज प्रीती आपल्या जुळ्या मुलांच्या बरोबरीनं 34 अनाथ मुलींचाही सांभाळ करते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :