Aditi Rao Hydari On Mallika Sherawat: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि त्यांचा ग्लॅमरस लूक (Glamorous Look) याच्या चर्चा नेहमीचं रंगल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा त्यांनी ग्लॅमरस लूकसाठी केलेल्या शस्त्रक्रियांबाबतही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. आजच्या काळात सौंदर्य खुलवण्यासाठी आणि बोल्डनेससाठी अनेक अभिनेत्री सर्रास सर्जरी करत असल्याचं पाहायला मिळतं. मग ते लिप फिलिंग असो वा ब्रेस्ट सर्जरी (Breast Surgery). पण, आजपासून काही वर्षांपूर्वी या गोष्टी आजच्याएवढ्या सहज नव्हत्या. त्यामुळे अशा सर्जरीबाबत बोलणंही फार खळबळ माजवणारं होतं. 

2013 मध्ये 'मर्डर 3' च्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री अदिती राव हैदरीनं (Aditi Rao Hydari) एका अभिनेत्रीवर थेट ब्रेस्टमध्ये सिलिकॉन (Silicone In The Breast) असल्याचा आरोप केलेला. त्यावेळी अदितीच्या वक्तव्यानं खळबळ माजली होती. अदितीनं ज्या अभिनेत्रीवर टिप्पणी केली होती, तिचं नाव म्हणजे, मल्लिका शेरावत. त्यावेळची टॉपची अभिनेत्री. मल्लिका त्यावेळी अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. त्या मल्लिकावर अदितीनं थेट भर पत्रकार परिषदेत टिका केली. त्यावेळी अदितीच्या शेजारी बसलेला रणदीप हुड्डाही लाजला होता. 

'मर्डर 3' च्या प्रमोशनवेळी अदिती राव हैदरी म्हणाली होती की, "But I truly believe that there’s far more to just sexuality. And I think you need to have steel in your soul and not silicon in your chest to be somebody of substance. But it’s true." 

आदिती राव हैदरी अभिनेता रणदीप हुड्डासोबत 'मर्डर 3' मध्ये होती. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अदितीला 'मर्डर' फ्रँचायझीमध्ये मल्लिका शेरावतची जागा घेण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मल्लिका अजूनही तिच्या 'मर्डर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. कारण चित्रपटातील दृश्य आणि गाणी अजूनही लक्षात आहेत. दरम्यान, आदितीच्या उत्तरानं तिचा सह-अभिनेता रणदीपसह सर्वांनाच धक्का बसला.

अदिती राव हैदरीचा हा जुना व्हिडीओ आता रेडिटवर व्हायरल झाला आहे. यामध्ये अभिनेत्री म्हणाली, "मला वाटतं की, मी लैंगिकतेपेक्षा खूप जास्त आहे. आणि मला वाटतं की, माणूस होण्यासाठी तुमच्या आत्म्यात पोलाद असायला हवा, छातीत सिलिकॉन नाही. पण ते खरे आहे. 

व्हिडिओ पहा :

मल्लिकाबाबत काय बोलून गेली अदिती...? 

अदितीच्या वक्तव्यानंतर रणदीप हुड्डाला धक्का बसला. त्यानं विचारलं की, "स्टील कुठंय?" त्यावर पुन्हा अदितीनं उत्तर दिलं की, "तुमचा आत्मा पोलादी हवा, नाही तुमच्या ब्रेस्टमध्ये सिलिकॉन. पण मी खरोखर यावर विश्वास ठेवते कारण मला वाटतं की, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, मार्ग निवडण्यासाठी आणि त्या मार्गावर विश्वास ठेवण्यासाठी, तुमच्याकडे फक्त एका पैलूपेक्षा जास्त पैलू असणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं की, आपल्या चित्रपटाचा विजय हा आहे की, तो फक्त त्यापेक्षा जास्त आहे. त्यात कामुकता आहे, पण ती आपल्याला हवी आहे म्हणून, दुसरं कोणीतरी आपल्याला करायला सांगतंय म्हणून नाही."

अदिती राव हैदरीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, आदिती राव हैदरी शेवटची संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये तिनं 'बिब्बोजान' ही भूमिका साकारली होती. अदितीच्या या भूमिकेचं सर्वच स्तरांतून कौतूक झालं. पण, तरीसुद्धा त्यानंतर तिला कोणतीही मोठी भूमिका मिळाली नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थशी लग्नगाठ बांधली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sai Pallavi Horror Thriller South Movie: साई पल्लवीच्या 'या' फिल्मचा दारवणारा ट्विस्ट, काळजाचा ठोका चुकवतो; 7 वर्षांपूर्वी गाजवलेलं बॉक्स ऑफिस, कोणत्या OTT प्लेटफॉर्मवर पाहाल?