Preity Zinta Doppelganger Lives In Pakistan: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) प्रिती झिंटा (Preity Zinta) म्हणजे, लाखो दिलांची धडकन... आजही ही अभिनेत्री अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. प्रिती झिंटानं आपला अभिनय आणि अदाकारीनं अनेकांची मनं जिंकली. 'दिल' चित्रपटापासून तिनं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला बेस्ट फीमेल डेब्यू या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. प्रिती झिंटानं 1998 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि आजही ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते. प्रिती झिंटा तिच्या गालावरच्या खळीमुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते. पण, ती एकमेव नाही बरं का? जिच्या गालावरच्या खळीवर लाखो तरुण मरतात. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरही डिंपल क्वीन आहे, तिच्याही गालावर खळी पडते. तसेच, अनेकांचा असाही दावा आहे की, हानिया आमिर प्रिती झिंटासारखी दिसते.
हानिया आमिर हुबेहुब प्रिती झिंटाची कॉपी
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर तिच्या लूकसाठी ओळखली जाते. मेकअपशिवायही ती खूप सुंदर दिसते. विशेष म्हणजे, हानियाची फॅन फॉलोईंग फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातही आहे. सध्या भारतात तिचं खूप क्रेझ आहे. मेरे हमसफर, दिल रुबा, मुझे प्यार हुआ था, इश्किया हे तिचे शो लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. हानियाचा नवा शो येत असल्याचं चाहत्यांना कळताच ते तिच्या एपिसोड्सची वाट पाहू लागले आहेत. सध्या भारतात हळूहळू पाकिस्तानी सीरिअल्यचं क्रेझ वाढत आहे. त्यासोबतच पाकिस्तानी अभिनेते आणि अभिनेत्री देखील चर्चेत येत आहेत.
कोण आहे हानिया आमिर?
प्रिती झिंटा आणि हानिया आमिरमध्ये बरंच साम्य आहे. तिच्या चेहऱ्यावरच्या डिंपल्सपासून तिच्या मेकअपपर्यंत. दोघींचे चेहरे, डोळे आणि भुवया सारख्याच आहेत. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आहे. एवढंच काय तर, दोघींचे फेस फिचर्सही मॅच होतात.
हानिया आमिर ही 27 वर्षीय अभिनेत्री आहे, जी प्रामुख्यानं पाकिस्तानी उर्दू टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम करते. तिचा जन्म रावळपिंडी इथे झाला आणि तिनं फाउंडेशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथे शिक्षण घेतलं. 2016 मध्ये, तिनं रोमँटिक कॉमेडी जनानसाठी ऑडिशन दिलं आणि तेव्हापासून ती पाकिस्तानच्या सर्वात टॉप अभिनेत्रींपैकी एक बनली. हानिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल अपडेट्स देत असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :