Mulshi pattern 2: 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचं विशेष कौतुक होत आहे. 'देऊळ बंद' (Entertainment) तसेच 'देऊळ बंद 2' या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांना आणखी एक गुडन्यूज दिलीये. 'मुळशी पॅटर्न' या सिनेमाच्या सिक्वेलपटाची तयारी सुरू झाली आहे. 'तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट', असे या सिनेमाचे घोषवाक्य असून, 'मुळशी पॅटर्न 2' या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, या सिनेमाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
'मुळशी पॅटर्न 2' कधी रिलीज होणार? (Mulshi pattern 2 Movie Announced by Pravin Tarde)
2018 साली 'मुळशी पॅटर्न' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातून शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात विकत घेऊन त्यावर कॉर्पोरेट उभारणाऱ्यांचे वास्तव समोर आणले. या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून प्रचंड प्रेम मिळालं. या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता या सिनेमाच्या सिक्वेलबाबत प्रवीण तरडे यांनी मोठी अपडेट दिली. या सिनेमाचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'मुळशी पॅटर्न 2' या सिनेमाची निर्मीती पुनीत बालन स्टुडिओ आणि अभिजीत भोसले जेन्युन प्रॉडक्शन यांच्या वतीने करण्यात येणार आहे. आज युवा उद्योजक पुनीत बालन, अभिजीत भोसले आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या सिनेमाची घोषणा केली. 'तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट' असे सिनेमाचे घोषवाक्य असून, वाळू माफियांच्या वाढत्या जाळ्यावर आधारीत असणार अशी माहिती आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हा सिनेमाच्या चित्रीकरणाला कधी सुरुवात होणार? हा सिनेमा नेमका कधी रिलीज होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या सिनेमात नेमके किती आणि कोणते कलाकार असणार? या सिनेमातून प्रेक्षकांना कोणता संदेश मिळणार? असे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
