Pune Crime News: पुण्याजवळच्या तुळापूर येथे पुणे पोलिसांनी (Pune Police) एका पार्टीवर टाकलेल्या छाप्याबाबत असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी देखील आता एका प्रश्न उपस्थित केला आहे. प्रत्यक्षात 156 जण या पार्टीत सहभागी असताना फक्त 78 जणांवर गुन्हा दाखल का केला गेला? उर्वरित 78 आरोपींना का सोडण्यात आले असे त्या म्हणाल्या आहेत.

Continues below advertisement

याबाबत सविस्तर बोलताना खडसे म्हणाल्या की, मला आठवतंय प्रांजल यांच्या प्रकरणात चार-पाच लोक एकत्र जमले होते. त्याला पुणे पोलिसांनी 'रेव्ह पार्टी'चं नाव दिले होते. आता 156 लोक सापडली त्याला 'हाऊस पार्टी' म्हणत आहेत. प्रांजल यांच्यासह सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते व सर्वांची टेस्ट करण्यात आली होती. मग आता पुणे पोलीस 156 लोकांपैकी इतर 78 लोकांवर इतकी का मेहरबान झाली? फक्त 78 लोकांवर कारवाई केली मग इतर 78 लोकांना का सोडण्यात आले? फक्त 29 लोकांचीच का टेस्ट करण्यात आली? यातून पुणे पोलिसांचा दुटप्पीपणा दिसत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Rohini Khadse: पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 

रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, इतर लोकांना सोडले ते काय आमदार, खासदारांचे मुलं होती का? की हाय प्रोफाइल लोक होती जी सरकारला मदत करतात? पोलीस सांगत आहेत की या पार्टीची परवानगी घेण्यात आली होती पण परवानगीचा एक साधा पेपर दाखवला जात नाही. ना अद्याप कारवाईचा एखादा व्हिडिओ समोर आला आहे. प्रांजल यांच्या प्रकरणात व्हिडिओ बाहेर पाठवले जात होते. मीडियाला माहिती पुरवून मीडिया ट्रायल चालवला जात होता‌, असे गंभीर आरोप करत असतानाच त्यांनी पुणे पोलिसांना कोण तरी चावी देतो तसं पुणे पोलीस वागतं आहे का? असा सवालही उपस्थित केला आहे. सर्वात पहिले तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या तुळापूरात या पार्टीची परवानगी दिलीच कशी गेली आणि तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी! याचा खुलासा गृहमंत्र्यांनी करायला हवा, अशी मागणी त्यांनी केलीय. 

Continues below advertisement

Pune Crime News: 23 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले

दरम्यान, प्रोजेक्ट एक्स पार्टी प्रकरणात उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींपैकी 23 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपास अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकरणाची माहिती संबंधित तरुणांच्या पालकांना देण्यात येणार असून, त्यांचे समुपदेशन (कौन्सिलिंग) देखील करण्यात येणार आहे. मात्र, या तरुण-तरुणींविरोधात सध्या कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Pune Crime News: विमान अन् अलिशान कार घेऊन बाहेरच्या राज्यातील मुलं पुण्यात पार्टीला, 'प्रोजेक्ट एक्स'बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?