Riteish Deshmukh Reaction on Joining Politics: हिंदीसह मराठी इंडस्ट्री गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या ऐतिहासिक सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात त्यानं अभिनय आणि दिग्दर्शन (Entertainment) दोन्ही केलं. अभिनेता बरेच वर्ष या प्रोजेक्टवर (Politics) काम करत होता. त्याच्या कष्टाला अखेर यश मिळालं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  आता रितेश देशमुख संपूर्ण महाराष्ट्राचा लाडला भाऊ बनला आहे. रितेश देशमुख हा दमदार अभिनेता जरी असला तरी, त्याचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे  माजी दिवंगत मुख्यमंत्री होते. त्यांनी राजकारणात अहोरात्र जनतेची सेवा केली. रितेशचे दोन्ही भाऊ हे देखील राजकारणात सक्रीय आहेत. दरम्यान, अभिनेत्याला राजकारणात एन्ट्री करणार का?  असा प्रश्न वारंवार विचारला जातो. या प्रश्नावर रितेश देशमुखने जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

रितेश देशमुखला राजकारणात एन्ट्री करण्याची इच्छा होते का? (Riteish Deshmukh viral answer on politics)

 मराठी सिनेसृष्टीतील लाडका अभिनेता रितेश देशमुखने अलिकडेच एका वृत्तवाहिनीच्या  महाराष्ट्र गौरव कार्यक्रमात हजेरी लावली होती.  यावेळी रितेशला, 'तामिळनाडूमध्ये थलापती विजय हे तेथील आता मुख्यमंत्री झाले आहेत. ते खूप प्रसिद्ध आहेत.  तिथे कलाकार राजकारणात जातात. पण आपल्याकडे तसं होत नाही.  ते बघून तुम्हाला कधी वाटलं का की, आपणही कलाकार आहोत, आपणही पॉप्यूलर आहोत,  आपणही असा प्रयत्न करावा का? राजकीय बॅकग्राऊंड तर आहेच..' असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर रितेश देशमुखनं भन्नाट आणि थेट उत्तर दिलं आहे. अभिनेता म्हणाला, 'जेवढी समज विजय यांना स्वत:च्या प्रसिद्धीची आहे. तेवढी समज मला सुद्धा आहे.  त्यामुळे मी असले प्रयोग कधी करणार नाही', असं रितेश देशमुख हसत म्हणाला. यानंतर अभिनेत्याला, 'असं का पण? तुम्हाला राजकारणाचा कंटाळा आला आहे का? नेमकं काय वाटतं?', असा प्रश्न विचारण्यात आला. यावरही रितेशनं भन्नाट आणि विनोदी उत्तर दिलं आहे. 

'उद्या जर मी राजकारणात आलो तर, तुम्हीच म्हणणार की, एकाच घरातले किती लोक राजकारणात येतात', असं भन्नाट उत्तर रितेश देशमुखनं दिलं.  रितेश देशमुख राजकारणात सक्रीय जरी नसला तरी, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी ही राजकीय घराण्याची आहे. निवडणुकीच्या वेळी अनेकदा अभिनेता त्यांचा प्रचार करताना दिसला होता. सध्या अभिनेत्याची चर्चा 'राजा शिवाजी'मुळे प्रचंड होत आहे.

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हिंदी मालिकेच्या सेटवर मराठी अभिनेत्रीचा अपमान; 'गावठी मराठी नको, हिंदी प्रॉपर बोला', दिग्दर्शकाचा संताप