Prashant Damle : 'गेला माधव कुणीकडे' या नाटकाने रंगभूमीवर आपली छाप सोडली होती. रसिक प्रेक्षकांच्या मनावरही या नाटकाची जादू अजूनही कायम आहे. आता पुन्हा हे नाटक रंगभूमीवर येणार असून काही ठराविकच प्रयोग या नाटकाचे होणार आहेत. त्याचसाठी प्रशांत दामले (Prashant Damle) हे नाटकाच्या प्रयोगांची माहिती त्यांच्या सोशल मीडियावरुन देत असल्याचं पाहायला मिळतंय. 


पण सध्या सोशल मीडियावर या नाटकापेक्षा एका कमेंटची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशांत दामले यांनी पोस्ट केलेल्या या प्रयोगाच्या माहितीवर एकाने कमेंट करत चक्क दामलेंना निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर प्रशांत दामलेंनी देखील जशास तसं उत्तर त्याला दिलं आहे. नाट्यसृष्टीमधलं प्रशांत दामले हे एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्वं. त्यांच्या नावावर 12000 प्रयोगांचा रेकॉर्ड देखील आहे. तरीही दामले हे आजही प्रेक्षकांच्या तितकेच पसंतीस उतरतात. 


दामलेंनी कमेंटवर काय उत्तर दिलं?


प्रशांत दामले यांनी केलेल्या एका पोस्टवर एकाने त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला. त्यावर दामलेंनी उत्तर देत म्हटलं की, रसिक प्रेक्षक बोलत नाहीत हे खर आहे.पण त्यांच्या मेसेज वरून कळत कि कधी थांबायचे ते. मला अंदाज येतो. सल्ल्याबद्दल धन्यवाद. दामलेंच्या उत्तरावर पुढे कोणत्याही प्रकारची कमेंट आली नाही. त्यामुळे रसिक प्रेक्षकांचा आदर करत योग्य त्या शब्दांत दामलेंनी ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले.




प्रशांत दामले यांच्याबद्दल जाणून घ्या...


प्रशाांत दामले हे अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष असण्यासोबत लोकप्रिय अभिनेते आहेत. गेली चार दशके असंख्य मराठी नाटके, चित्रपट, आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. अभिनेते असण्यासोबत ते गायक, पार्श्वगायक आणि नाट्यनिर्मातेही आहेत. विनोदी अभिनयासाठी मराठी नाटक आणि चित्रपट जगतात ते परिचित आहेत.


कलेच्या प्रवासात प्रशांत दामले यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत. त्यांनी नाटकाशिवाय 37 मराठी चित्रपट आणि 24 दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. यात 'आम्ही सारे खवय्ये' या लोकप्रिय मालिकेचाही समावेश आहे. दामले यांना 20 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कलारंजन पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार यांचा समावेश आहे.


ही बातमी वाचा : 


Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा' सिनेमामुळे 'आम्ही जरांगे'ची रिलीज डेट पुढे ढकलली, आता 'या' दिवशी येणार सिनेमा भेटीला