Mirzapur 3 : ओटीटीवर बहुप्रतिक्षित असलेला मिर्झापूर (Mirzapur 3) या सिरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा झालाय. पण प्रेक्षकांनी विशेष करुन मुन्ना भैय्याला सर्वात जास्त मिस केलं. त्यामुळे अनेकांना हा सिझन आवडला नाही. मिर्झापूर सिरिजमधली अगदी छोटी व्यक्तिरेखीही फार लक्षवेधी ठरली आहे. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे त्रिपाठी हाऊसमध्ये कामाला असलेली रधिया. 


रधियाची व्यक्तिरेखा ही अनेक मुद्द्यांवर भाष्य करणारी ठरली आहे. पहिल्या दोन सिझनमध्ये जिचं शोषण होतं अशी ही व्यक्तिरेखा, तिसऱ्या सिझनमध्ये मात्र ती स्वतंत्र दाखवली आहे. रधिया हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री प्रशंसा शर्मा हीने नुकतच एबीपीसोबत संवाद साधला. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या व्यक्तिरेखेविषयी आणि दिव्येंदुविषयी भाष्य केलं आहे. 


'मी मुन्ना भैय्याला अजिबात मिस केलं नाही'


रधियाने म्हटलं की, जेव्हा कुलभूषण हे बापूजीच्या भूमिकेत असायचे तेव्हा रधिया म्हणून त्यांच्या शेजारी बसायलाही कसंतरी वाटायचं, इतकं ते त्या पात्रात असायचे. पण जेव्हा ते त्यातून बाहेर यायचे, सगळ्यात सुंदर अशी व्यक्ती असायची. पात्र म्हणून मुन्ना भैय्याचीही मला खूप वाटायची. तिसऱ्या सिझनमध्येही जेव्हा मी ज्या खोलीत आमचे सीन शूट झालेत, त्या खोलीत जायचे तेव्हा मला किळस वाटायची.पण पुन्हा तेच दिव्येंदु हा खूप चांगला माणूस आहे. मी आतापर्यंत काम केलेल्या माझ्या सगळ्यात चांगल्या सहकलाकारांपैकी तो एक आहे. रधिया म्हणून तिसऱ्या सिझनमध्ये मला खूप बरं वाटलं. प्रशंसा म्हणून मी दिव्येंदुला खूप मिस केलं. पण रधिया म्हणून मी मुन्ना भैय्याला अजिबात मिस केलं नाही. 


मुन्ना भैय्याला परत आणण्यासाठी चाहत्यांनी सुचवली आयडिया!


मिर्झापूर सीझन 3 च्या पहिल्याच सीनमध्ये जेव्हा मुन्ना भैय्याचा मृतदेह आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार दाखवण्यात आले तेव्हा चाहत्यांना फार वाईट वाटलं. त्यामुळे तिसऱ्या सिझनमध्ये मुन्ना भैय्या दिसणार नाही हे स्पष्ट झालं. मुन्ना भैय्याचं पात्र संपवल्यामुळे लोकांना तिसरा सिझन बघावासा वाटला नाही, असंही अनेकजण म्हणत आहे. त्यामुळे आता चाहत्यांनी अनेक आयडिया सांगितल्या आहेत, ज्यामुळे मुन्ना भैय्याची सिझनमध्ये पुन्हा एन्ट्री होऊ शकते. 


अशी होऊ शकते मु्न्ना भैय्याची एन्ट्री


मुन्ना भैय्याच्या एन्ट्रीसाठी एकाने आयडिया देत म्हटलं की, चौथ्या सिझनमध्ये कालिन भैय्याची बायको बिना भाभी आणि तिचा मुलगा म्हणून मुन्ना भैय्या चौथ्या सिझनमध्ये दिसू शकतो. त्यामुळे चौथ्या सिझनमध्ये बिना भाभीच्या मुलाच्या भूमिकेत मुन्ना भैय्या दिसू शकतो. 


ही बातमी वाचा : 


Mirzapur Season 4 :  'मुन्ना भैय्या'च्या एन्ट्रीचा मार्ग मोकळा! कसं होणार धमाकेदार कमबॅक? जाणून घ्या सविस्तर