Nilu Phule Biopic : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा लवकरच धर्मवीर-2 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची भूमिका प्रसादने साकारली आहे.  धर्मवीरच्या पहिल्या भागातही प्रसादच्या या भूमिकेचं भरभरुन कौतुक झालं. पण सध्या प्रसाद ओकच्या एका नव्या सिनेमाची चर्चा सुरु आहे. 


प्रसाद ओक लवकरच ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्यावर बायोपिक घेऊन येणार आहे. या बायोपिकची तुफान चर्चा सुरु असून या सिनेमाच्या शुटींगलाही लवकरच सुरुवात होणार असल्याचं प्रसादने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे पुढच्या वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. या सिनेमा करताना प्रसादने सुरुवातीला निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले यांची परवानगी मागितली. हा किस्सा नुकताच प्रसादने शेअर केला आहे.                           


गार्गी फुलेंनी काय म्हटलं?


प्रसादने नुकतीच अजब गजब या पॉडकास्टला मुलाख दिली. त्यामध्ये त्याने या सिनेमाविषयी भाष्य केलं आहे. प्रसादने म्हटलं की, मी गार्गीला विचारलं की, मला निळू भाऊंवर बायोपिक करायचा आहे. तू परवानगी देशील का? त्याक्षणी तिने म्हटलं की, तू नाही करायचास तर कुणी करायचा निळू फुलेंवर बायोपिक... कारण तू इतकं जवळून पाहिलं आहेस त्यांना, त्यांचे बारकावे तू टिपत आला आहेस.. फक्त बाई वाड्यावर या! एवढ्यापुरते निळू फुले नाहीत. खूप काम आहे त्यांचं..


पुढे प्रसादने म्हटलं की, किरण यज्ञोपवीतने चित्रपट लिहिला आहे.. त्यासाठी दोन सव्वा दोन वर्षे तो रिसर्च करतोय... तो जवळपास 200 ते 250 लोकांना भेटला आहे, भाऊंबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत... कारण तो फार अवघड चित्रपट होता लिहायला.. एक तर माणूस म्हणून त्याचा एक ट्रॅक आहे, एक सोशल ट्रॅक आहे, एक राजकीय ट्रॅक आहे आणि एक अभिनेता म्हणून ट्रॅक आहे.. या चार ट्रॅकवर तो सिनेमा लिहायचा हा खूप मोठा टास्क होता... पण किरणने प्रचंड मेहनत केली आहे त्याच्यावर आणि तो सिनेमा लिहून पूर्ण झालाय. त्याचं आता प्री सुरु होईल आणि पुढच्या वर्षी मी फ्लोअरवर जाईन...


ही बातमी वाचा : 


Raj Thackeray : मोठी बातमी: मनसेप्रमुख राज ठाकरे अभिनेता सलमान खानच्या भेटीला, भाईजानला खास कार्यक्रमाचं आमंत्रण