Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आधारित 'येक नंबर' (Yek Number) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बुधवार 25 सप्टेंबर रोजी या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी सलमान खानला (Salman Khan) आमंत्रित करण्यासाठी स्वत: राज ठाकरे हे त्याच्या घरी गेले असल्याची माहिती सध्या देण्यात येत आहे. 


राज ठाकरे हे सलमानच्या भेटीसाठी त्याच्या घरी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट येथे गेले. येक नंबर या सिनेमा ट्रेलर मुंबईतील वांद्रे येथील ताज हॉटेल येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी सलमान खानला राज ठाकरे यांच्याकडून निमंत्रित करण्यात आलं असल्याचं म्हटलं जातंय. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली आहे. 


10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार चित्रपट


राज ठाकरे यांच्यावर आधारित येक नंबर हा सिनेमा येत्या 10 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमा अभिनेता धैर्य घोलप हा मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमा विषय नेमका काय? राज ठाकरे यांचा हा बायोपिक तर नाही असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत. त्यामुळे या सिनेमाच्या ट्रेलरमधून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता प्रेक्षकांना मिळणार आहेत. 


तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला ह्या 'येक नंबर' चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर या चित्रपटाला, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला आपल्या संगीतावर ठेका धरायला लावणारे, अजय -अतुल यांचे धमाकेदार संगीत लाभलं आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.                                        


'कथाच या चित्रपटाचा नायक'


या सिनेमाविषयी प्रतिक्रिया देताना तेजस्वी पंडितने म्हटलं की, '' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. टिझरला मिळणारा प्रतिसाद पाहाता चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी खात्री आहे. मराठी प्रेक्षक कथानकाला विशेष प्राधान्य देतात. 'येक नंबर'ची कथा अतिशय कमाल असून ही कथाच या चित्रपटाचा नायक आहे. अशा प्रकारचा प्रयत्न मराठीत यापूर्वी कधीही झाल्याचे मला आठवत नाही.’’


ही बातमी वाचा : 


ऑस्कर्ससाठी 'लापता लेडीज'च का? अॅनिमल, कल्कि 2898 एडी', 'आट्टम' का नाही? सिलेक्शन कमिटीनं थेटच सांगितलं