Prasad Oak Birthday : अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकचा (Prasad Oak) आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची बायको मंजिरी ओक (Manjiri Oak) हिने एक पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंजिरीने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी देखील कमेंट्स करत प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंजिरी आणि प्रसाद ओक यांनी नुकतच त्यांच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच आता प्रसादच्या वाढदिवसानिमित्त देखील मंजिरीची पोस्ट चर्चेत आली आहे. 


अभिनेता प्रसाद ओकचा आज वाढदिवस असून सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून आणि मित्र परिवाराकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अभिनेता प्रसाद ओकने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट देत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. हिरकणी सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करुन प्रसाद दिग्दर्शक म्हणून देखील प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस पडला. हिरकणी या चित्रपटासाठी मंजिरीने सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली होती.


मंजिरीने दिल्या प्रसादला शुभेच्छा


मंजिरीने इन्स्टाग्राम पोस्ट करत प्रसादला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा एक फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिलं की, प्रसाद फोटोत तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की ,मी अशी वागेन , गप्प बसेन , तुला बोलू देईन ,मी फक्त ऐकेन .तर जागा हो . फोटो आहे तो , मी फक्त फोटो मधेच गप्प बसू शकते …तुला पर्याय नाही. Oh sry sry आज चांगलं बोलायचं असतं ना ? okok स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. Happyyyyyy birthday. 






प्रसादचा सिनेप्रवास (Prasad Oak Movies)


प्रसाद ओकचा पहिला सिनेमा म्हणजे बॅरिस्टर. या सिनेमासह त्याने ऐका दाजिबा, एक डाव धोबी पछाड, लगे रहो मुन्नाभाई, कलियुग, जेहेर, जोशी की कांबळे, पकडापकडी, हरी माझी घरी, हिप हिप हुर्रे, खेळ मांडला, निर्मला, धतिंग धिंगाणा, बाळकडू, डॉक्टर रमाबाई, 7 रोशन व्हिला, शिकारी, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, ये रे ये रे पैसा, पिकासु, हिरकणी, धुरळा अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमात त्याने साकारलेली आनंद दिघे यांची भूमिका चांगलीच गाजली. सहाय्यक दिग्दर्शक ते आघाडीचा अभिनेता हा प्रसाद ओकचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. 


ही बातमी वाचा :