Savalyachi Janu Savali Prapti Redkar on harassment: 'सावळ्याची जणू सावली' (Savalyachi Janu Savali) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) सोशल मीडियात प्रचंड चर्चेत असते. या मालिकेत प्राप्ती 'सावली' ही व्यक्तीरेखा साकारत आहे. तिनं 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेव्यतिरिक्त इतर मालिकांमध्येही काम केलं. अभिनयाव्यतिरिक्त अभिनेत्री कराटेमध्येही पारंगत आहे. तिनं ब्लॅक बेल्ट पटकावला आहे. अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक प्रकरण घडलं.  तिनं मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या भयंकर घटनेचा खुलासा केला. 

Continues below advertisement

प्राप्ती रेडकरने सांगितलं तिच्यासोबत घडलेला वाईट प्रसंग (Prapti Redkar on Molestation)

प्राप्ती रेडकरने 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली होती.  प्राप्ती रेडकर म्हणाली की, 'मी शूटिंगसाठी ट्रेनने जायचे. गर्दीतून कोण येऊन हात लावून जातं, ते लवकर समजून येत नाही. त्या दिवशी माझ्यासोबत कॉस्च्युम डिपार्टमेंटचा मुलगा होता. मी घटनेच्या दिवशी मालाड स्टेशनला होते. प्लॅटफॉर्मच्या दिशेनं जात होते.  एक व्यक्ती मला स्पर्श करुन गेला. तेव्हा कळालं नाही नक्की कोण होतं.  मी त्या छेड काढणाऱ्या मुलाची कॉलर पकडली. त्याच्या डोक्यात फोन टाकून प्रायव्हेट पार्टवर मारलं.  तो मुलगा खाली पडला'.

 

Continues below advertisement

'कॉस्च्युम डिपार्टमेंटचा मुलगा मला वाचवायचा सोडून पळून गेला होता.  या ठिकाणी किक बॉक्सिंगची मला मदत झाली', असं प्राप्ती रेडकर म्हणाली.  'आता माझं शूटिंगसाठीचं काम सुरुये.   म्हणून मी जास्त फाईट नाही करत. सेटवर माझे सर आणि माझ्यासोबतचे स्पर्धक माझी खूप काळजी घेतात', असं प्राप्तीने सांगितलं.   प्राप्तीला  कराटेची आवड आहे. 2021 साली तिनं किक बॉक्सिंगमध्ये  सुवर्णपदक मिळवलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?

Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा