Mrunal Thakur Salman Khan Sultan: आऊटसायडर असूनही अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हिनं सिनेसृष्टीत आपल्या नावाचा ठसा उमटवला. तिनं अनेक बॉलिवूड सिनेमांसह वेब सिरीजमध्ये चांगली कामगिरी केली. तिनं कोणतंही बॅकग्राऊंड नसताना सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याचं धाडस केलं. मृणाल ठाकूरचे वडील उदयसिंह बी. हे एक बँक कर्मचारी आहेत.  तर, तिची आई वंदना ठाकूर गृहणी आहेत. मृणालला लोचन ठाकूर नावाची बहीण आणि धवल ठाकूर नावाचा भाऊ आहे. तिची बहीण एक मेकअप आर्टिस्ट आहे.   तर, भाऊ इंजिनिअर आणि अभिनेता असल्याची माहिती आहे.    अभिनेत्रीचा सलमान खानच्या (Salman Khan) फॉर्महाऊसमधील एक किस्सा प्रचंड (Entertainment) चर्चेत आला होता. 

Continues below advertisement

मृणाल ठाकूरने  एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिच्या पालकांना तिला डेंटिस्ट बनवायचे होते.  पण अभिनेत्रीला डॉक्टर व्हायचे नव्हते. मृणालला पत्रकार व्हायचे होते. तिनं मीडियाचा अभ्यास करण्यासाठी मुंबईतील एका कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. पण ती डिग्री पूर्ण करु शकली नाही. 2012 साली तिनं कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना, असंच एके ठिकाणी ऑडिशन दिली होती.  तिचं ऑडिशनमध्ये सिलेक्शनही झालं होतं. तिनं पुढे अॅक्टिंग करिअर म्हणून निवडलं. तिनं मीडियाचा कोर्स अर्धवटच सोडून दिला.

मृणाल ठाकूरने आपल्या कारकि‍र्दीत बरेच चढ उतार पाहिले आहेत (Mrunal Thakur rejected for Sultan)

मृणाल ठाकूरला पहिला ब्रेक स्टारमधील एका सिरिअलमधून मिळाला.  'मुझसे कहती...ये खामोशियां' या मालिकेत तिनं काम केलं. या मालिकेतून तिच्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात झाली.     तिला आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच चढ उताराचा सामना करावा लागला.  फिल्म 'सुल्तान'मधून तिला सलमान खानने रिजेक्ट केले असल्याची माहिती आहे.  सलमान खान आणि अनुष्का शर्मा या दोघांनीही या सिनेमात जबरदस्त कामगिरी केली आहे.  अनुष्का पूर्वी मृणाल ठाकूरला या सिनेमाची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. याचा खुलासा सलमान खानने बिग बॉसमध्ये केला होता.

Continues below advertisement

सलमानने सांगितलं की, 'एके दिवशी दिग्दर्शक अली अब्बास जफर, मृणालला घेऊन पनवेल स्थित फार्महाऊसमध्ये आले होते. जेव्हा मी मृणालला पाहिलं, तेव्हा ती खूप शरीरयष्टीने बारीक होती', सलमानला तेव्हा वाटलं की, पैलवानाच्या भूमिकेसाठी ती योग्य नाही. त्यामुळे सलमान खानने मृणाल ठाकूरला रिजेक्ट केलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा