Saurabh Choughule Ajinkya Rahane Insta Post: मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी 30 जुलै 2026 रोजी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावनिक व्हिडीओ शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्यांनी व्हिडीओतून चाहत्यांचेही आभार मानले. अजिंक्य राहाणे यावेळी भावुक झाला असल्याचं पाहायला मिळालं. अजिंक्य राहाणे यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे चाहते निराश झाले.  अलिकडेच सौरभ चौघुले (Saurabh Choughule) या मराठी अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने अजिंक्य राहाणेसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

Continues below advertisement

सौरभ चौघुलेकडून अजिंक्य राहाणेसोबतचा फोटो शेअर (Saurabh Choughule shares childhood photo with Ajinkya Rahane)

मराठी अभिनेता सौरभ चौघुलेनं मालिकांमध्ये काम करुन  प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. अलिकडेच तो आपल्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सौरभ चौघुलेनं अंजिक्य राहाणे यांच्यासोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने सुंदर कॅप्शन देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणीचा क्रिकेट टीमसोबतचा त्याने फोटो शेअर केला. सौरभने कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'हाय, अजिंक्य.  हा फोटो इतके वर्ष जपून ठेवला होता. मागच्या वर्षी कपाट साफ करताना सापडला. हा फोटो अपलोड करायची माझी बरीच इच्छा होती, पण का कुणास ठाऊक मी केला नाही'.

'आधी रेल्वे ग्राऊंड नंतर जिमखानामध्ये आपण खेळलो.  खातू सरांसोबत तांडेल सरांकडे शिकायची संधी मिळाली.   अजिंक्य तू लहान असताना मोठ्या प्लेअर्सच्या नेटमध्ये प्रॅक्टिस करायचा.  तुला बॉलिंग करायला त्यांना सुद्धा खूप मजा यायची, कारण तू प्रत्येक बॉल बॅटने भिरकावून लावायचास. आम्हाला तेव्हा कायम सांगितलं जात होतं की, अजिंक्य कडे बघा तो कसा खेळतोय, त्याला observe करा....'.

Continues below advertisement

'मी अजिबात चांगला खेळायचो नाही. जेव्हा क्लब लेव्हल किंवा स्टेट लेव्हल मॅचेस असायचेत, तेव्हा तू फक्त 14 वर्षांचा होतास. तू अंडर 14 नाही तर नेहमी अंडर 19 मध्ये खेळायचास, अन् तुझे बाबा आवर्जून तुझ्या प्रत्येक मॅचला हजर असायचे. मला आठवतंय 2011 मध्ये जेव्हा तू debut केलंस, तेव्हा मी 23 वर्षांचा असेन आणि तू देखील.जेव्हा पहिल्यांदा तुझं नाव 'इंडियन टीम'मध्ये आलं, तेव्हा तुझा खूप अभिमान वाटला. जास्त करून माझ्या आई बाबांना तुझा अभिमान वाटला. तेव्हा एकदम typically मला आई बोली होती "बघ तो कुठे पोहचला नाहीतर तू!'.

'आज तुझा व्हिडिओ पाहिला अन् मन भरून आलं, खास करून जेव्हा तू डोंबिवलीचं नाव घेतलंस. एक मराठी मुलगा शून्यातून वर आला आणि त्याने आज स्वतःला सिद्ध केलं. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे अजिंक्य. Thank you for every single innings you played. Every single Indian is proud of you...! ....अन् याच फोटोत बरोबर मध्ये उभा असलेला टीम इंडिया साठी खेळलेला क्रिकेटरला तुम्ही ओळखलं का? (एक गोलंदाज)'. असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?